मुंबई परिसरात जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:56 PM2019-03-05T18:56:49+5:302019-03-05T19:02:01+5:30

येणाऱ्या 2025 पर्यंत महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले असून जेम अँड ज्वेलरी क्षेत्राचे यात फार मोठे योगदान असणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली.

CM Devendra Fadnavis announced to set up Gem and Jewelry University in Mumbai area | मुंबई परिसरात जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई परिसरात जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

मुंबई -  येणाऱ्या 2025 पर्यंत महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले असून जेम अँड ज्वेलरी क्षेत्राचे यात फार मोठे योगदान असणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. नवी मुंबईच्या महापे येथे इंडिया ज्वेलरी पार्कच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

या प्रसंगी मुख्यमंत्री  म्हणाले की, गेल्या वर्षी जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल परिषदेच्या कार्यक्रमात मी आलो असताना या पार्कसंदर्भात चर्चा झाली होती. अतिशय कमी कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे, ही समाधानाची बाब आहे. जगात भारत या क्षेत्रात निर्यातीत आघाडीवर असल्याने हा पार्कदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण पार्क म्हणून संपूर्ण जगात नावारूपाला यावा अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

कारागिरांना घरे देणार

या व्यवसायात सुरक्षेलाही तितकेच महत्त्व आहे. ती या प्रस्तावित पार्कमध्ये मिळेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सुमारे १ लाख लोक यात काम करणार आहेत. त्यात अनेक कारागीर देखील असतील. त्या सर्वांना पार्कच्या जवळपासच्या भागात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. जेम अँड ज्वेलरी क्षेत्रातील व्यापार १०० बिलियन डॉलर्सच्या वर नेण्याची आपली क्षमता आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनविण्यात याचे मोठे योगदान राहिल, असेही ते म्हणाले.

स्वतंत्र विद्यापीठ स्थापणार

या क्षेत्रात कौशल्य आवश्यक आहे, अनेक व्यक्ती, तरुण यात काम करतात. यासाठी जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ मुंबई तसेच परिसरात स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. खासगी विद्यापीठ कायद्यासंदर्भातील निकषाप्रमाणे तिची केंद्रे सुरु करता येतील असेही ते म्हणाले.

काय आहे ज्वेलरी पार्क ?

फेब्रुवारी २०१८ मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल यांच्याशी महाराष्ट्र शासनाने एक सामंजस्य करार केला होता. त्यानुसार आज ज्याप्रमाणे झवेरी बाजार येथे सोने-चांदी- हिरे यांचा व्यापार चालतो तसा महापे येथे एका छताखाली तो इंडिया ज्वेलरी पार्कच्या माध्यमातून चालविला जाणार आहे. १४ हजार ४६७ कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. यामुळे ४१ हजार ४६७ कोटींची उलाढाल होईल. चीनमधील शेनझेन मॉडेल प्रमाणे हे पार्क विकसित केले जाणार असून यामुळे विखुरलेला हा व्यापार एका ठिकाणी येईल व निर्यातीला अधिक चांगले प्रोत्साहन मिळेल. याठिकाणी ४ हजार ५०० उद्योग –व्यवसाय सुरु होतील तसेच १ लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल. सध्या रत्न आणि दागिने व्यापाराचा देशातील एकूण निर्यातीत १५ टक्के वाटा असून हे क्षेत्र पूर्णत: कारागीर आणि कामगारांवर आधारित आहे.
 

Web Title: CM Devendra Fadnavis announced to set up Gem and Jewelry University in Mumbai area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.