लोअर परळ पूल अवजड वाहनांसाठी बंद करा - रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 02:25 AM2018-07-21T02:25:55+5:302018-07-21T02:26:12+5:30

पश्चिम रेल्वेने नुकत्याच केलेल्या पाहणीत लोअर परळ येथील पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढला.

Close Lower Parel Bridge for Cumbersome Vehicles - Railway | लोअर परळ पूल अवजड वाहनांसाठी बंद करा - रेल्वे

लोअर परळ पूल अवजड वाहनांसाठी बंद करा - रेल्वे

Next

मुंबई : पश्चिम रेल्वेने नुकत्याच केलेल्या पाहणीत लोअर परळ येथील पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढला. यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून प.रे.ने रेल्वेने मुंबई पालिकेला हा पूल तातडीने बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोअर परळ पुलाच्या पाहणीनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी, पूल धोकादायक असल्याचे पालिकेला कळविले आहे. पाहणीत लोअर परळ स्थानकातील शेकडो वर्षे जुन्या पुलाचे खांब आणि कठडे गंजले आहेत. त्याचबरोबर, पुलाच्या काही भागातून मुसळधार पावसात पाणी झिरपते. यामुळे तूर्तास अवजड वाहनांसाठी पूल तातडीने बंद करण्यात यावा, असा निष्कर्ष काढत, कारवाई करण्याचे पत्र प.रे.ने पालिका अधिकाºयांना लिहिले आहे. दरम्यान, पालिकेतील संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधला असता, ‘बैठकीत’ असल्याचे सांगून अधिक माहिती देण्याचे टाळले.
शहर-उपनगरातील काँटिलिव्हर पद्धतीच्या पुलांची पाहणी प्राथमिकतेने करण्यात येणार असून, यानंतर उर्वरित पुलांची पाहणी करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले. अंधेरी दुर्घटनेनंतर सुरू केलेल्या पाहणीत अंधेरी गोखले पूल (दक्षिण वाहिनी), वांद्रे कलानगर, वसई रोड येथील जुना पूल, मालाड सबवे धोकादायक असल्या कारणाने बंद करण्यात आला आहे. लोअर परळ, ग्रँट रोड आणि मिरारोड स्थानकातील पुलांची पाहणी विशेष पथकामार्फत सुरू असल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Close Lower Parel Bridge for Cumbersome Vehicles - Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.