मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात, महापौरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 02:23 PM2018-06-07T14:23:24+5:302018-06-07T14:23:24+5:30

मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात, असा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

The Chief Minister intervenes in the work of the corporation, criticizing the Mayor | मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात, महापौरांची टीका

मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात, महापौरांची टीका

Next

मुंबई- मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात, असा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. मुख्यमंत्री मंत्रालयातील आपत्कालीन बैठकीलाही आम्हाला बोलवत नाही. हस्तक्षेप करण्यामागे मुख्यमंत्र्यांचा नेमका हेतू काय आहे ? हे अद्याप समजलेलं नाही, असंही महाडेश्वर म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आतापर्यंत 90 टक्के नाल्यांची साफसफाई झाली आहे. पावसाळ्यात समुद्राला भरती आली आणि 300 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यावर मुंबई तुंबणार आहे. बचावासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. अतिवृष्टीसाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज असून, मुंबईकरांना त्रास न होण्याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ, असं आश्वासनही विश्वनाथ महाडेश्वरांनी दिलं आहे. मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे मुंबईत पाणी तुंबेल.

महापालिकेकडून नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून, मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला आहे. प्रशासनानं पूर्ण जोमाने मुंबईतील नालेसफाईची कामे केली आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत पाणी तुंबून मुंबईकरांचे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ही कामे वेळेत केली गेली आहेत. 

Web Title: The Chief Minister intervenes in the work of the corporation, criticizing the Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.