छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ९, १० एप्रिलला ६ तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:55 AM2018-02-18T00:55:20+5:302018-02-18T00:55:34+5:30

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी ९ आणि १० एप्रिल रोजी मान्सूनपूर्व कामांसह उपाययोजनांच्या कामांसाठी ६ तास बंद ठेवण्यात येणार आहे, तर पावसाळ्यानंतर २३ आॅक्टोबर रोजी मान्सून प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठीही धावपट्टी ६ तास बंद ठेवण्यात येईल.

Chhatrapati Shivaji International Airport closed for 6 hours on April 9th | छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ९, १० एप्रिलला ६ तास बंद

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ९, १० एप्रिलला ६ तास बंद

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी ९ आणि १० एप्रिल रोजी मान्सूनपूर्व कामांसह उपाययोजनांच्या कामांसाठी ६ तास बंद ठेवण्यात येणार आहे, तर पावसाळ्यानंतर २३ आॅक्टोबर रोजी मान्सून प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठीही धावपट्टी ६ तास बंद ठेवण्यात येईल.
९ आणि १० एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या दरम्यान विमानतळावरील एकमेकांना छेदणाºया बिंदूवरील धावपट्टीवर (९/२७ आणि १४/३२) काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशीच्या विमान उड्डाणांच्या वेळापत्रकांत बदल करण्यात आला आहे. ज्या प्रवाशांची विमाने रद्द करण्यात आली आहेत, त्यांनी विमानाच्या उड्डाणाची दुसरी वेळ घ्यावी, असे विमान प्रशासनातर्फे जाहीर करण्यात
आले आहे.

पावसाळ्यानंतर २३ आॅक्टोबरलाही दुरूस्ती
पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. त्यासाठी २३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान धावपट्टी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.

Web Title: Chhatrapati Shivaji International Airport closed for 6 hours on April 9th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.