Changes in the date of 12 branch of Law branch | विधि शाखेच्या १२ परीक्षांच्या तारखेत बदल
विधि शाखेच्या १२ परीक्षांच्या तारखेत बदल

मुंबई : मुंबई विद्यापीठाने विधि विभागाच्या परीक्षांचे निकाल जाहीर न करता पुढील सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या १४८ महाविद्यालयांचे लाखो विद्यार्थी तणावाखाली होते. याची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी मुंबई विद्यापीठाने विधि शाखेच्या (५ वर्षीय व ३ वर्षीय) १२ परीक्षांच्या तारखेत बदल करीत या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तसेच विधि शाखेचे आणखी काही निकालही जाहीर केले आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विधि शाखेच्या काही परीक्षांचा निकाल उशिरा लागल्याने तसेच काही निकाल प्रलंबित असल्याने अनेक विद्यार्थी तसेच विद्यार्थी संघटना यांनी अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
केली होती. त्याची दखल घेत विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
यातील काही परीक्षांची सुरुवात २२ मे २०१८पासून होणार होती, त्या परीक्षा आता ३० मे २०१८पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
>निकालाची गाडी रुळावर येणार!
सेमिस्टर १, ३, ५ चे निकाल जाहीर होणे बाकी असले, तरी विद्यापीठाने मंगळवारी विधि शाखेचे दोन निकाल जाहीर केले आहेत. यात १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या एल.एल.बी. प्रथम वर्ष व जनरल एल.एल.बी. सेमिस्टरचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस ६,६३५ विद्यार्थी बसले होते. यातील १,९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचे उत्तीर्णतचे प्रमाण ३६.२६ टक्के एवढे आहे, तसेच विधि शाखेच्या तृतीय वर्ष (३ वर्षीय व ५ वर्षीय) एल.एल.बी. सेमिस्टर ५च्या जानेवारी, २०१८ रोजी झालेल्या परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस २,४८९ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचे उत्तीर्णतेचे प्रमाण ३४.६२ टक्के एवढे आहे. त्यामुळे विलंबाने लागणाºया निकालाची गाळी हळूहळू रुळावर येईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


Web Title: Changes in the date of 12 branch of Law branch
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.