Central Railway running 15 minutes late | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप, वाहतूक 15 मिनिटं उशिरानं

डोंबिवली - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाकुर्ली स्थानकात एलसी गेट उघडं राहिल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागल्यानं प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

दरम्यान, मध्य रेल्वे पाठोपाठ हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूकदेखील विस्कळीत झाली आहे. गोवंडी रेल्वे स्टेशन ते चेंबूर रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं सीएसटीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.