ओव्हरहेड वायरवर फांदी पडल्याने मरेचा खोळंबा, स्फोट झाल्याने प्रवाशांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 12:41 AM2018-06-12T00:41:50+5:302018-06-12T00:41:50+5:30

भायखळा स्टेशनजवळ ओव्हरडेह वायरवर फांदी पडून स्फोट झाल्याने मध्य रेल्वेच्या डाऊन जलद मार्गाची वाहतूक काही काळ खोळंबली. मात्र ओव्हरहेड वायरचा स्फोट झाल्यानंतर लोकल थांबल्याने तसेच आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांची, विशेषत: महिला प्रवाशांची तारांबळ उडाली. 

central Railway News | ओव्हरहेड वायरवर फांदी पडल्याने मरेचा खोळंबा, स्फोट झाल्याने प्रवाशांची तारांबळ

ओव्हरहेड वायरवर फांदी पडल्याने मरेचा खोळंबा, स्फोट झाल्याने प्रवाशांची तारांबळ

मुंबई - भायखळा स्टेशनजवळ ओव्हरडेह वायरवर फांदी पडून स्फोट झाल्याने मध्य रेल्वेच्या डाऊन जलद मार्गाची वाहतूक काही काळ खोळंबली. काही वेळाने बिघाड दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र ओव्हरहेड वायरचा स्फोट झाल्यानंतर लोकल थांबल्याने तसेच आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांची, विशेषत: महिला प्रवाशांची तारांबळ उडाली. 
भायखळा येथे १०.५ ला येणारी कल्याण जलद लोकल आधीच २० मिनिटे उशिरा आली. त्यात भायखला रेल्वे स्थानकापासून काही अंतर पुढे जाताच शेवटच्या महिला डब्ब्यात वरील ओव्हरहेड वायरमध्ये फांदी पडल्याने स्फोट झाला. एकामागोमाग ३ जोराचे हादरे बसल्याने भीतीने महिलांची पळापळ झाली. त्यात डब्ब्यातील विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आल्याने काही जणी उतरताना किरकोळ जखमी झाल्या. स्थानिक नागरिक, रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. अखेर ३० मिनिटांनी फांदी हटवून लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र स्फोट झाला असताना क़ाही जणांनी लोकलला आग लागल्याची अफवा पसरविल्याने गोंधळात भर पडली. 

पोटातल्या बाळासाठी तिची धड़पड
सीएसएमटी येथे रेल्वे पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर असलेली सपना बाग़ुल या देखील याच डब्ब्यात अडकल्या होत्या. त्या अंबरनाथ येथील रहिवासी असून गरोदर आहेत. आज कर्तव्य बजावून विठ्ठलवाडी येथे आईकडे जाण्यासाठी  शेवटच्या ड़ब्ब्यात बसल्याचे तिने सांगितले. उतरल्यानंतर थेट रिक्षा पकडणे सोयिस्कर जाते. असे त्या म्हणाल्या.   नाहीतर एरवी मधल्या डब्बा पकड़त असल्याचे त्यानी संगितले. या स्फोटामुळे माझ्या बाळाला काही होणार नाही ना या भीतीने तीही घाबरली होती. पोलिसांकडे खाली उतरविण्यासाठी मदत मागत होती. पोलिसानी समज़ूत काधत शांत केले.
 
तो ठरला हिरो
स्फोटामुळे महिलाची पळापळ झाली. अशात डब्ब्यात असलेले होमगार्ड मच्छींद्रनाथ कुताळ हे डब्ब्यात होते. जवळपास ४० ते ४५ महिला ड़ब्ब्यत होत्या. आशावेळी त्यांना धीर देन्याचे काम त्यानी केले. ते महिलाना समज़ूत काढत होते. अनेक जणी त्यानाच टार्गेट करत अंगावर धावून गेल्या. मात्र ते त्यांना तीतक्याच शांततेत समजूत काढत होते. त्यांनी वेळीच महिलांना अटकाव केल्यामुळे काही जणी वाचल्या. अन्यथा खाली उतरण्याच्या घाईल. त्या सीएसएमटीकडे जाणा-या लोकलखाली आल्या असत्या. क़ुताळ हे गेल्या ३२ वर्षांपासून सेवेत आहे.
 

Web Title: central Railway News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.