Cabinet minister Girish Bapat's 'service quarter fire' | अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या 'बंगल्यातील सर्व्हंट क्वार्टरला आग'
अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या 'बंगल्यातील सर्व्हंट क्वार्टरला आग'

मुंबई - अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या बंगल्यातील सर्व्हंट क्वार्टरला आग लागली होती. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर ती आटोक्यात आणण्यात आली. मंत्री बापट यांच्या मलबार हिल येथील बंगल्याच्या सर्व्हंट क्वार्टरला ही लागली होती. 

मुंबईतील मलबार हिल येथे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा बंगला आहे. या बंगल्याचं नाव ज्ञानेश्वर असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याशेजारीच हा बंगला आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बंगल्यातील क्वार्टरला ही आग लागली. याबाबत माहिती मिळताच, तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तर यावेळी खुद्द जलसंधारणमंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. त्यांनीही आग विझविण्यासाठी धावपळ केली. त्यानंतर तात्काळ आग आटोक्यात आणण्यात आली असून, आगीचे कुणीही जखमी नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काही प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे जवळच महादेव जानकर यांचाही बंगला आहे.

पाहा व्हिडीओ -

 


Web Title: Cabinet minister Girish Bapat's 'service quarter fire'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.