The budget of the state will be held on March 9 in both the Houses of the Legislature | राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात होणार सादर

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते २८ मार्चपर्यंत चालेल. राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात येईल. हा निर्णय गुरुवारच्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी कामकाजाची माहिती दिली. ३५ दिवसांच्या अधिवेशनात २२ दिवस कामकाज चालेल. २६ फेब्रुवारीला राज्यपालांचे अभिभाषण होईल. अर्थसंकल्प ९ मार्चला दुपारी २ वाजता सादर होईल. अधिवेशनात विधानसभेत १, तर विधानपरिषदेत ४ विधेयके प्रलंबित आहेत.