मुंबई : अभिनेता शाहरूख खानच्या रेड चिल्लीज या प्रॉडक्शन हाउसच्या बेकायदा हॉटेलवर मुंबई महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. गोरेगाव पश्चिम येथे स्वामी विवेकानंद मार्गावरील डीएलएच पार्क या इमारतीतील चौथ्या मजल्यावर हे हॉटेल आहे. गच्चीवरील रेस्टॉरंटला पालिकेने अद्याप मंजुरी दिलेली नाही, मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून हे हॉटेल या इमारतीच्या गच्चीवर दोन हजार चौरस फूट जागेमध्ये चालवण्यात येत होते.
रेड चिल्लीज या कंपनीमार्फत शाहरूख खान व त्याची पत्नी गौरी खान चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या कंपनीचे गोरेगाव पश्चिम येथे एस. व्ही. रोडवर प्रशस्त कार्यालय आहे. ‘रेड चिल्लीज एफएम’चे कार्यालयही याच ठिकाणी आहे. येथील कर्मचाºयांसाठी उपाहारगृह नसल्याने हे हॉटेल बांधण्यात आले होते, असे समजते. रेड चिलीज कंपनीच्या कार्यालयातील सुमारे दोन हजार चौरस फुटांची गच्ची अनधिकृत बांधकाम करून बंद करून हे हॉटेल चालवण्यात येत होते. हे सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. कारवाई करण्यासाठी पालिकेचे २५ कामगार-कर्मचारी-अधिकारी यांच्यासह पालिकेच्याच अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी असणा-या पोलीस पथकातील पोलीस कर्मचारीही घटनास्थळी कार्यरत होत, अशी माहिती पी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांनी दिली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.