मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आचारसंहितेमुळे अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 02:18 AM2019-02-16T02:18:48+5:302019-02-16T02:19:07+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. परिणामी, महापालिकेच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी मिळण्यासाठी थेट जून महिना उजाडणार आहे.

 BMC's Budget for Budget | मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आचारसंहितेमुळे अडचणीत

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आचारसंहितेमुळे अडचणीत

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. परिणामी, महापालिकेच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी मिळण्यासाठी थेट जून महिना उजाडणार आहे. त्यानंतर पुन्हा विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यास विकासकामांना ब्रेक लागणार आहे. असे झाल्यास सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील तरतूद वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असून आचारसंहितेपूर्वी अर्थसंकल्पाला झटपट मंजुरी देण्याची लगबग सुरू आहे.
सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प ३० हजार ६९२ कोटींचा होता. यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्याने जास्तीतजास्त निधीचा वापर विकासकामांवर करण्याचा लोकप्रतिनिधींचा भर आहे.

सर्वपक्षीय गटनेत्यांना देणार प्रतिनिधित्व
स्थायी समितीमध्ये चर्चा झाल्यानंतर मंजुरी देऊन अर्थसंकल्प महासभेपुढे पाठविण्यात येतो. आपल्या विभागातील विकासकामांसाठी जास्तीतजास्त निधी मिळविण्याकरिता नगरसेवक आपले प्रश्न या चर्चेत मांडत असतात. आपल्या विभागाचे गाºहाणे मांडण्याची संधी मिळावी यासाठी नगरसेवक चर्चेत सहभाग घेतात. त्यामुळे अर्थसंकल्पावरील चर्चा बरेच दिवस सुरू राहते. मात्र या वेळेस सर्वपक्षीय गटनेत्यांनीच आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीने चर्चेत सहभाग घेऊन त्यांचे प्रश्न मांडावेत, असा विचार सुरू आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चर्चा आटपून अर्थसंकल्प मंजूर करण्याची लगबग सुरू आहे.

Web Title:  BMC's Budget for Budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.