हार्बरवर उद्या रात्रकालीन, मध्य रेल्वेवर दिवसा ब्लॉक  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 07:16 AM2018-11-10T07:16:47+5:302018-11-10T07:17:12+5:30

हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवार रात्रकालीन आणि ठाणे-कल्याण जलद मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला.  

Block at the Harbor on the night, Central Railway tomorrow night | हार्बरवर उद्या रात्रकालीन, मध्य रेल्वेवर दिवसा ब्लॉक  

हार्बरवर उद्या रात्रकालीन, मध्य रेल्वेवर दिवसा ब्लॉक  

googlenewsNext

मुंबई : हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवार रात्रकालीन आणि ठाणे-कल्याण जलद मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला. पश्चिम रेल्वेने रविवारी असलेला जम्बोब्लॉक रद्द केला आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी
अप/डाऊन मार्गावर रविवारी रात्री १.३० ते रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात रविवारी पहाटे सीएसएमटी/पनवेल-वाशी- बेलापूर/सीएसएमटी या मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रॉन्स हार्बर, मध्य मार्गावरुन प्रवास करण्याची मुभा आहे. ठाणे-कल्याण डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक काळातील काही लोकल फेºयांना घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलूंड
स्थानकावर विशेष थांबा देण्यात येईल.

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा; जम्बोब्लॉक रद्द
पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची रविवारच्या ब्लॉकच्या त्रासातून यंदा सुटका होणार आहे. रविवारचा जम्बोब्लॉक रद्द करण्यात
आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य
जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी
सांगितले.

Web Title: Block at the Harbor on the night, Central Railway tomorrow night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.