केबल दरवाढीविरोधात २९ डिसेंबरला ब्लॅक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:20 AM2018-12-13T06:20:09+5:302018-12-13T06:20:35+5:30

ट्रायच्या नव्या नियमांना विरोध

Black out on December 29 against cable price hike | केबल दरवाढीविरोधात २९ डिसेंबरला ब्लॅक आऊट

केबल दरवाढीविरोधात २९ डिसेंबरला ब्लॅक आऊट

Next

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या नियमानुसार २९ डिसेंबरपासून प्रत्येक वाहिनीसाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागणार असल्याने केबलचे दर वाढतील आणि ग्राहक डिश टीव्हीकडे वळतील. त्यामुळे या निर्णयाच्या निषेधार्थ २९ डिसेंबरला ब्लॅक आऊटचा घेण्यात आल्याची माहिती केबलचालकांच्या संघटनांनी दिली.

ट्रायच्या अधिकाऱ्यांसमोर केबल व्यावसायिकांनी ही नाराजी मांडली असून मध्यममार्ग काढण्याची मागणी केली आहे. प्रत्येक वाहिनीसाठी स्वतंत्र पैसे आकारून दरवाढ करायची आणि केबल व्यावसायिकांना या व्यवसायातून हटवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केबल व्यावसायिकांनी केला. मुंबई केबल नेटवर्क असोसिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ गिरकर यांनी अशी नाराजी असल्याचे मान्य करत ‘ब्लॅक आऊट’वर चर्चा सुरु असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

ग्राहकांच्या निवडीच्या नावावर करण्यात आलेली ही दरवाढ अन्यायकारक आहे. रिलायन्सच्या भल्यासाठी हे नवे नियम असून २९ डिसेंबर या धीरुभाई अंबानीच्या जयंतीचे औचित्य साधून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचा आम्हाला संशय आहे. मुंबईतील लाखभर केबल व्यावसायिकांना रस्त्यावर आणणारा हा निर्णय आहे.
-विश्वनाथ गिरकर, अध्यक्ष, मुंबई केबल नेटवर्क असोसिएशन
 

Web Title: Black out on December 29 against cable price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.