भाजपाला मांजरास वाघ व कुत्र्याचा हत्ती करण्याची कला साध्य झाली आहे - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 07:49 AM2017-12-04T07:49:47+5:302017-12-04T07:53:49+5:30

‘जिथे ईव्हीएम तिथे कमळ’ हा जो आक्षेप घेतला जात आहे त्यालाच जर तुम्ही दणदणीत विजय म्हणत असाल तर या दणदणीत विजयास आमच्या शुभेच्छा आहेत! अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 

The BJP has got the art of elephants of Manjaraas Tiger and Dogs - Uddhav Thackeray | भाजपाला मांजरास वाघ व कुत्र्याचा हत्ती करण्याची कला साध्य झाली आहे - उद्धव ठाकरे 

भाजपाला मांजरास वाघ व कुत्र्याचा हत्ती करण्याची कला साध्य झाली आहे - उद्धव ठाकरे 

Next
ठळक मुद्देशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामना संपादकीयमधून भाजपावर टीका'उत्तर प्रदेशात ‘अपक्ष’ व इतरांचाही ‘विकास’ जिंकला. तरीही पुनः पुन्हा विकास जिंकत असल्याचे दावे' ‘जिथे ईव्हीएम तिथे कमळ’ हा जो आक्षेप घेतला जात आहे त्यालाच जर तुम्ही दणदणीत विजय म्हणत असाल तर शुभेच्छा'

मुंबई - उत्तर प्रदेशात ‘अपक्ष’ व इतरांचाही ‘विकास’ जिंकला. तरीही पुनः पुन्हा विकास जिंकत असल्याचे दावे केले जात आहेत. जिथे ईव्हीएमने मतदान झाले, त्या महापालिकांमध्ये भाजपला यश मिळाले आणि जिथे ईव्हीएमने मतदान झाले नाही अशा ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र ‘कमळ’ फुलले नाही. त्यामुळे ‘जिथे ईव्हीएम तिथे कमळ’ हा जो आक्षेप घेतला जात आहे त्यालाच जर तुम्ही दणदणीत विजय म्हणत असाल तर या दणदणीत विजयास आमच्या शुभेच्छा आहेत! अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 

गुजरात राज्यात ‘विकास गांडो थयो छे’ म्हणजे वेडा झाला असला  तरी ‘उत्तर प्रदेश में विकास जिंदा है’ असे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘योगी’राज्यात झाल्या. त्यात भाजपची सरशी झाली आहे व इतर पक्ष साफ भुईसपाट झाल्याचे जे चित्र समोर आणले जात आहे ते सत्य आहे काय? भाजपला आकडा फुगवून सांगण्याची खोड आहे व आकडय़ांची खातरजमा न करता अभिनंदनाचे ‘ट्विट’ संदेश पाठविण्याची सवय पंतप्रधानांना आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायती निवडणूक निकालांत याचा अनुभव आपण घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी नक्की कुणाचे अभिनंदन केले हा प्रश्न निर्माण होतो असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 

उत्तर प्रदेशात महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. शहरी भागात भाजपने आघाडी घेतली आहे. १६ पैकी १४ शहरांत भारतीय जनता पक्षाचे महापौर विराजमान झाले, दोन ठिकाणी मायावती यांच्या बसपास यश मिळाले हे खणखणीत सत्य आहे व त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पक्षाचे खास अभिनंदन करीत आहोत. समाजवादी पार्टी व काँग्रेसचा येथे साफ धुव्वाच उडालेला दिसतो, पण जे शहरात घडले ते उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात घडलेले दिसत नाही. गावाकडचे चित्र वेगळे आहे. भारतीय जनता पक्षाने विजयाचा शंखनाद जरूर करावा, पण त्या शंखनादात सत्य मारले जाऊ नये. उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ६५२ जागांपैकी २२५ जागी अपक्ष उमेदवार जिंकले असल्याची माहिती खुद्द निवडणूक आयोगानेच दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष गट हा सर्वात मोठा ठरला हे नाकारून कसे चालेल? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ४३८ जागांवर निवडणुका झाल्या. त्यात १८२ अपक्ष अध्यक्ष निवडून आले. भाजप १००, समाजवादी पार्टी ८३, बसपा ४७, काँग्रेस १७ व इतर पक्षांना ९ जागा मिळाल्या. त्यानंतर नगरपालिकांचे निकाल पहा. १९८ अध्यक्षांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजपास ७०, समाजवादी पक्ष ४५, अपक्ष ४३, बसपा २९, काँग्रेस ९ व इतर पक्ष २ असे निकाल लागले. या निकालात भाजपची सरशी झाली असे कसे म्हणता येईल? पण हे लोक कमालीचे  धाडसी व हिंमतबाज असल्याने मांजरास वाघ व कुत्र्याचा हत्ती करण्याची कला त्यांना साध्य झाली आहे व एरव्ही जागरूक असलेला मीडियारूपी चौथा स्तंभही ‘मांजरा’कडे बघून तो वाघच आहे व हे सर्व योगी किंवा मोदींमुळेच शक्य झाल्याचे सांगत सुटला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

या मोकाटपणास स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणावा इतके हे भयंकर पद्धतीने सुरू आहे. मतदानाच्या टक्केवारीकडे पाहिले तरी भाजपची घसरगुंडी झाल्याचे स्पष्ट दिसते व लोकसभा, विधानसभेच्या तुलनेत २० टक्के मताधिक्य घटले आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपने ८० जागा जिंकल्या, विधानसभेत २४५ जागांवर विजय मिळविला. त्या तुलनेत नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकांत भाजपने यश मिळविले नाही. अपक्षांचा विजयी आकडा भाजपच्या वर आहे व बसपा, समाजवादी पार्टीलाही मतदारांनी जिवंत केले आहे, पण सत्य स्वीकारण्याची तयारी नाही व जिथे पराभूत झालो तिथेही आपणच जिंकलो असे छातीठोकपणे सांगण्याचे कसब या मंडळींकडे आहे. पंतप्रधानांनीही आनंदाने उत्तर प्रदेशातील जनतेचे अभिनंदन केले व सांगितले, ‘‘पुन्हा विकास जिंकला’’. मोदी यांनी मतदारांचे जाहीर आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशातील विजयी शंखनाद ही आकडय़ांची हातचलाखी आहे, पण नक्की आकडा काय लागला याबाबत संभ्रम आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Web Title: The BJP has got the art of elephants of Manjaraas Tiger and Dogs - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.