भिवंडी अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजप्रकरण: आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:08 AM2017-10-14T04:08:21+5:302017-10-14T04:08:38+5:30

भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणामध्ये गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी आणखी एका आरोपीस अटक केली. एकूण आरोपींची संख्या १० झाली असून अन्य आठ आरोपींचा शोध सुरू आहे.

Bhiwandi unauthorized telephone exchange process: Another person arrested | भिवंडी अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजप्रकरण: आणखी एकाला अटक

भिवंडी अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजप्रकरण: आणखी एकाला अटक

Next

ठाणे : भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज प्रकरणामध्ये गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी आणखी एका आरोपीस अटक केली. एकूण आरोपींची संख्या १० झाली असून अन्य आठ आरोपींचा शोध सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल सीमबॉक्सद्वारे राउट करून ते संबंधिताच्या मोबाइल फोनवर वळते करणाºया अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी मंगळवारी केला. याप्रकरणी नऊ आरोपींना अटक झाली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी १० दिवसांनी वाढवली.
भिवंडीतील ३० टेलिफोन एक्स्चेंजवर पोलिसांनी मंगळवारी छापे टाकले. त्यापैकी एका छाप्यामध्ये पोलिसांना टेलिफोन एक्स्चेंजचे साहित्य आढळले. मात्र, घटनास्थळी आरोपी नव्हता. समशेर अहमद अन्वर अली शेख हे त्याचे नाव असून शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली. आरोपींची टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर आरोपींनी कोणत्या उद्देशाने केला, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केली.

Web Title: Bhiwandi unauthorized telephone exchange process: Another person arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.