बँका सलग चार दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 02:01 AM2018-04-26T02:01:14+5:302018-04-26T02:01:14+5:30

नागरिकांच्या हातात बँकांचे व्यवहार करण्यासाठी फक्त दोन दिवस आहेत.

Banks closed for four consecutive days | बँका सलग चार दिवस बंद

बँका सलग चार दिवस बंद

Next

मुंबई : या महिन्यांच्या शेवटच्या शनिवारपासून ते मे महिन्याच्या मंगळवारपर्यंत सलग सार्वजनिक सुट्ट्या असल्याने बँका बंद राहणार आहेत. एप्रिलच्या २८ तारखेला चौथा शनिवार, २९ एप्रिलला रविवार, ३० एप्रिलला बुद्ध पौर्णिमा आणि १ मे ला महाराष्ट्र दिन, कामगार दिवस असल्याने, सलग चार दिवस बँकांचे काम ठप्प राहील. यामुळे चेक वटवणे, बँकेत पैसे टाकणे/काढणे शक्य होणार नाही. नागरिकांच्या हातात बँकांचे व्यवहार करण्यासाठी फक्त दोन दिवस आहेत. बँक बंद असलेल्या चार दिवसांत आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध आहे. २ मेपासून पुन्हा बँका पूर्ववत सुरू होतील.

Web Title: Banks closed for four consecutive days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक