गंगासफाईच्या गोष्टी करणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात बँका साफ होत आहेत - हार्दिक पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 09:02 PM2018-02-22T21:02:21+5:302018-02-22T21:02:44+5:30

भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टचार होऊ देणार नाही असे ओरडून बोलत होते. परंतु ज्या पद्धतीने विजय मल्ल्या आणि निरव मोदी देशाचे पैसे खाऊन देशाबाहेर पळून गेले. त्यावरून असे दिसते की भाजप सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहे. भाजप सरकार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजय मल्ल्या व निरव मोदी यांना भारतात कधी आणणार यावर एक शब्दही बोलत नाहीत.

Banks are clearing up during the BJP government doing Gangas Safai - Hardik Patel | गंगासफाईच्या गोष्टी करणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात बँका साफ होत आहेत - हार्दिक पटेल

गंगासफाईच्या गोष्टी करणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात बँका साफ होत आहेत - हार्दिक पटेल

googlenewsNext

 मुंबई -  भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टचार होऊ देणार नाही असे ओरडून बोलत होते. परंतु ज्या पद्धतीने विजय मल्ल्या आणि निरव मोदी देशाचे पैसे खाऊन देशाबाहेर पळून गेले. त्यावरून असे दिसते की भाजप सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहे. भाजप सरकार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजय मल्ल्या व निरव मोदी यांना भारतात कधी आणणार यावर एक शब्दही बोलत नाहीत. गंगासफाई करणाऱ्या सरकारच्या काळात बँकाच साफ होत चालल्या आहेत. ही या सरकारची मोठी नामुष्की आहे. हे सरकार नेहमी पैश्याच्या जोरावर निवडणुका जिंकत आले आहे. भाजप सरकार वर्षाला 200 ते 300 कोटी रुपये फक्त सोशल मीडियावर खर्च करते. याच सोशल मीडियाच्या जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. हीच सोशल मीडिया एखाद्याला पंतप्रधान बनवू शकते, तर याच सोशल मीडियाच्या जोरावर भाजप सरकारला येत्या निवडणुकीत पाडूही शकते, असे उद्गार पाटीदार समाजाचे क्रांतिकारी नेते हार्दिक पटेल यांनी मुंबईत काढले. हार्दिक पटेल हे आज मुंबई काँग्रेस च्या सोशल मीडिया टीमशी संवाद साधण्यासाठी मुंबईत आले होते. याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी आमदार चरणसिंग सप्रा, सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर यांच्यासह मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

हार्दिक पटेल पुढे म्हणाले की, गेल्या साडेतीन वर्षांत भाजप सरकारमुळे आपला देश बुडत चालला आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. देशात आतंकवाद वाढला आहे. आपला देश वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन लढले पाहिजे. देशातील तरुणांनी यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हायला पाहिजे. हा तरुणांचा देश आहे. अनेक तरुणांनी देश वाचवण्यासाठी समाजकारणात व राजकारणात आले पाहिजे. भाजप सरकार तरुणांना पकोडे विकायला शिकवत आहे. परंतु रोजगार द्यायचा विचार करत नाही. शेतकऱ्यांच्या व दलितांच्या मूलभूत गरजा व प्रश्नांचा विचार करत नाही. म्हणूनच या सरकार विरोधात लोकांना जागरूक केले पाहिजे. मी शंभर टक्के भाजप विरोधी आहे. मी काँग्रेसी नाही, परंतु काँग्रेसला मदत व पाठिंबा देणार आहे. यासाठी मी वारंवार मुंबईत येत राहणार आहे. त्यासाठी हे सरकार मला त्रास देईल. अनेक अडचणी निर्माण करेल. परंतु मी न घाबरता हे काम सुरूच ठेवणार आहे. भाजप सरकार छत्रपती शिवाजी महाराज, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे फक्त राजकारण करत आहे. घोषणा करतात, पुतळ्यांचे काम मात्र सुरू करत नाही. म्हणूनच माझ्यासहीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार उलथवून टाकण्याची वेळ आली आहे. भाजप सरकार पैशाच्या जोरावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याचा डाव रचत आहे. आपण सर्वांनी मात्र निष्ठा, मेहनत व  सोशल मीडिया यांच्या जोरावर लोकांना जिंकायचे आहे. लोकांमध्ये जागृती निर्माण करायची आहे.

हार्दिक पटेल पुढे म्हणाले की सोशल मीडिया हे खूपच अचूक आणि प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियामुळे एखादा संदेश 15 सेकंदांमध्ये 25 लाख लोकांपर्यंत पोहचू शकतो. व्हाट्सएप, ट्विटर, फेसबुक यांचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. सोशल मीडियावर एखादी चळवळ किंवा आंदोलन आपण उभे करू शकतो. व्हाट्सएप पेक्षा आता ट्विटर आता जास्त शक्तिशाली व प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियाच्या जोरावर आपण लोकांमध्ये जागृती व उठाव करून भाजप सरकारला उलथवून टाकू शकतो.

Web Title: Banks are clearing up during the BJP government doing Gangas Safai - Hardik Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.