बँक कर्मचारी उद्या दिल्लीवर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:47 AM2018-03-20T00:47:49+5:302018-03-20T00:47:49+5:30

देशातील सार्वजनिक बँकांच्या संभाव्य खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या युनायडेट फोरम आॅफ बँक युनियन्सने एकदिवसीय धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.

 Bank employees will hit Delhi tomorrow | बँक कर्मचारी उद्या दिल्लीवर धडकणार

बँक कर्मचारी उद्या दिल्लीवर धडकणार

Next

मुंबई : देशातील सार्वजनिक बँकांच्या संभाव्य खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या युनायडेट फोरम आॅफ बँक युनियन्सने एकदिवसीय धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. बुधवारी, २१ मार्च रोजी लोकसभेसमोर होणा-या या आंदोलनात कर्मचाºयांच्या विविध ९ संघटनांचे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी सहभागी होतील.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर म्हणाले की, या आंदोलनात एआयबीए-एआयबीओए, आयबोक-इन्बेफ, एनसीबीई-इन्बोक, बेफी, एनओबीडब्ल्यू, नोबो या संघटनांचे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी सहभागी होतील. देशातील बहुतेक सार्वजनिक बँका थकीत कर्जाच्या तरतुदीमुळे तोट्यात आहेत. या थकीत कर्जांमध्ये मोठ्या उद्योगांचा वाटा ७० टक्क्यांपर्यंत आहे. त्यात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या घोटाळ्यांमुळे सार्वजनिक बँकांची प्रतिमा मलिन केली जात आहे. पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याची मागणी केल्याने कर्मचा-यांमध्ये असंतोष आहे.

Web Title:  Bank employees will hit Delhi tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.