हा पुरस्कार नैराश्यावरील विजयाचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 04:48 AM2018-04-12T04:48:55+5:302018-04-12T04:49:14+5:30

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात चित्रपट (स्त्री) कॅटेगिरीतील पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक सुमित्रा भावे म्हणाल्या की, हा पुरस्कार म्हणजे आमच्या टीमचा सन्मान आहे.

This award symbolizes triumph over depression | हा पुरस्कार नैराश्यावरील विजयाचे प्रतीक

हा पुरस्कार नैराश्यावरील विजयाचे प्रतीक

Next

मुंबई- लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात चित्रपट (स्त्री) कॅटेगिरीतील पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक सुमित्रा भावे म्हणाल्या की, हा पुरस्कार म्हणजे आमच्या टीमचा सन्मान आहे. सकारात्मकतेने नैराश्यावर विजय मिळवता येतो, हा ‘कासव’ चित्रपटाचा विषय असून हा पुरस्कार म्हणजे नैराश्यावरील विजयाचे प्रतिक आहे. सुनील सुख्तनकर आणि अन्य कलाकारांचेही मी अभिनंदन करते. कासविणी जन्माला आलेल्या आपल्या पिल्लांना जसा नजरेने धीर देते आणि त्या बळावरच पिल्ले समुद्रापर्यंतची वाटचाल यशस्वीपणे करतात. त्याचप्रमाणे समाजाची वृत्ती असायला हवी. निराश झालेल्यांना धीर देऊन उभे करायला हवे. सध्याची नवी पिढी लहान-सहान गोष्टींनी निराश होते. त्यांना नवी उमेद दिली पाहिजे.

Web Title: This award symbolizes triumph over depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.