अशोक सावंत हत्या प्रकरण : लाइफ सेटल होण्यासाठी हत्याकांडात सहभाग, अल्पवयीन मुलाची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:32 AM2018-01-11T02:32:02+5:302018-01-11T02:32:05+5:30

‘तुझी लाइफ सेटल करून टाकू, तू आमच्यासोबत चल,’ या आमिषाला बळी पडून, माजी नगरसेवक अशोक सावंत हत्याकांडात आपण सहभागी झाल्याची कबुली या प्रकरणी अटक केलेल्या अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिली. सावंत यांच्या हत्या प्रकरणातील ही तिसरी अटक असून, अन्य तिघे फरार आहेत.

Ashok Sawant murder case: Participation in the massacre for a life settlement, a minor child's confession | अशोक सावंत हत्या प्रकरण : लाइफ सेटल होण्यासाठी हत्याकांडात सहभाग, अल्पवयीन मुलाची कबुली

अशोक सावंत हत्या प्रकरण : लाइफ सेटल होण्यासाठी हत्याकांडात सहभाग, अल्पवयीन मुलाची कबुली

googlenewsNext

- गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई : ‘तुझी लाइफ सेटल करून टाकू, तू आमच्यासोबत चल,’ या आमिषाला बळी पडून, माजी नगरसेवक अशोक सावंत हत्याकांडात आपण सहभागी झाल्याची कबुली या प्रकरणी अटक केलेल्या अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिली. सावंत यांच्या हत्या प्रकरणातील ही तिसरी अटक असून, अन्य तिघे फरार आहेत.
सावंत यांच्या हत्येप्रकरणी अटक अल्पवयीन मुलाने सावंत यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याचे कबूल केल्याचे, एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘माझी लाइफ सेटल होईल, शिवाय मला गाडी घेता येईल, पैसेदेखील मिळतील,’ असे आमिष दाखवून, सावंत यांच्या हत्येसाठी आपल्याला मुंबईत आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हा अल्पवयीन मुलगा पुण्यातील निगाडी परिसरातील रहिवासी आहे. तो पुण्यातील डी. वाय. पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेत इयत्ता १२वीच्या वर्गात शिकत होता. त्याला एक मोठी बहीण असून, तीदेखील कॉलेजमध्ये शिकते. त्याचे वडील पुण्यातील एका मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत, तसेच त्यांचा फोटो लॅमिनेशनचा व्यवसाय आहे. मात्र, मुलगा कोणाच्या संगतीत आहे किंवा तो काय करतोय, याबाबत घरच्यांना काहीच माहीत नव्हते, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मुलाला दारूचे व्यसन होते. सावंत यांच्या हल्लेखोरांसोबत त्याची मैत्री झाली. त्यानंतर, त्याचे मुंबईत येणे-जाणे होते. गेल्या दीड महिन्यात दोघांमधील मैत्री वाढली आणि त्यातूनच त्याला माजी नगरसेवकाच्या हत्येत सहभागी करून घेण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे, समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले.
जुन्या वैमनस्यातून हत्या
अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सावंत यांच्या हत्येमागचा नेमका उद्देश त्याला माहीत नाही. मात्र, मारेकºयांचे सावंत यांच्याशी जुने वैर असल्यानेच त्यांना संपविल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
चार हल्लेखोरांची ओळख पटली
या मुलासह सावंत यांच्यावर हल्ला करणाºयांमध्ये जगदीश पटेल उर्फ जग्गा, अभिषेक माने आणि अनिल वाघमारे यांचा समावेश आहे. हे तिघे फरार आहेत.

‘पाचशे’ रुपयांसाठी आयुष्य पणाला!
अटक करण्यात आलेल्या मुलाला काम झाल्यानंतर मोठी रक्कम देण्याचे आमिष दिले गेले. मात्र, नेमकी रक्कम नक्की झाली नव्हती. हल्ल्याच्या वेळी सर्व हल्लेखोर दारूच्या नशेत होते. त्यातच त्यांनी सावंत यांच्यावर हल्ला चढविला.
मात्र, हल्ला करून पळताना ‘नंतर बघू’ असे सांगत, त्याच्या हातात अवघे ‘पाचशे’ रुपये ठेवण्यात आले. त्यानंतर, तो रक्ताने माखलेले कपडे घालूनच थेट पुण्याला पसार झाला. हे कपडे त्याने तसेच काढून लपवून ठेवले होते. ते नंतर पोलिसांनी हस्तगत केले.

फिर्यादीही संशयित?
सावंत यांच्यावर हल्ला झाला, तेव्हा ते त्यांचा सहकारी विशाल सोनवणे याच्या स्कुटीवरून घराच्या दिशेने निघाले होते. रिक्षात बसून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या स्कुटीला लाथ मारली. यामुळे ते दोघेही खाली पडले. तेव्हा रिक्षातून हल्लेखोर खाली उतरत, त्यांनी सावंत यांच्यावर हल्ला चढविला, तर सोनवणे रिक्षाचा पाठलाग करत रिक्षमागून धावले.
त्यानंतर, पुन्हा मागे परतले, तोपर्यंत मारेकºयांनी सावंत यांना रक्तबंबाळ केले. सोनावणे यांना साधे खरचटलेही नाही, याचे विशेष तपास अधिकाºयांना आश्चर्य वाटत आहे, जिथे घटना घडली, तिथे सीसीटीव्ही नाहीत.
त्यामुळे त्या ठिकाणी नेमके काय घडले, हे अद्याप समोर आलेले नाही. फरार आरोपी अटक होईपर्यंत कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नसून, आम्ही प्रत्येकाकडे संशयित म्हणूनच पाहत असल्याचे तपास अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Ashok Sawant murder case: Participation in the massacre for a life settlement, a minor child's confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.