भरमसाट फी वाढ करणाऱ्या शाळेची मान्यता होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:07 AM2019-04-24T06:07:55+5:302019-04-24T06:08:11+5:30

दहिसरमधील खासगी शाळा; पालिका प्रशासनाचा इशारा

The approval of the school will not be accepted | भरमसाट फी वाढ करणाऱ्या शाळेची मान्यता होणार रद्द

भरमसाट फी वाढ करणाऱ्या शाळेची मान्यता होणार रद्द

Next

मुंबई : दहिसर पश्चिम येथील एका खासगी शाळेने फी दुप्पट वाढवली. तसेच फी न भरणाºया ४० विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने घरी पाठविले. याचे पडसाद शिक्षण समितीच्या बैठकीत मंगळवारी उमटले. या शाळेतून काढलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश न दिल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने शाळेला नोटीसद्वारे दिला.

या शाळेने नियमानुसार दरवर्षी १० टक्के फी वाढ करणे अपेक्षित होते. गेल्या वर्षीपासून यात थेट ३० ते ४० टक्क्यांची वाढ सुरू केली आहे. शाळेच्या या मनमानीबाबत शिक्षण समिती बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे याकडे लक्ष वेधले. सुमारे ४० हजार रुपये फी भरून मुलांना या शाळेत नर्सरीत दाखल केले. मात्र वर्ष पूर्ण होताच पहिलीच्या वर्गात जाण्याच्या वेळी फीमध्ये भरमसाट वाढ केली.

बेताची परिस्थिती असणाºया पालकांनी जादा फी भरण्यास नकार देताच त्यांच्या मुलांचे दाखलेच शाळेने पोस्टाने घरी पाठवले. शाळेच्या मनमानी फीविरोधात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वी अहवाल मागून घेतला. चर्चेअंती फीबाबत निर्णय घेता येईल, असे त्यांनी शाळा संचालकांना कळविले. मात्र चर्चा न करताच शाळा व्यवस्थापनाने जादा फी भरण्यास पालकांना भाग पाडले, असा आरोप म्हात्रे यांनी केला.

दुसºया नोटिशीकडेही दुर्लक्ष
नियमबाह्य फी वाढ करता येणार नाही, अशी नोटीस पालिकेने संबंधित शाळेला दिली. त्याकडे दुर्लक्ष करणाºया या शाळेची सुविधा का काढून घेऊन नये, अशी विचारणा करणारी दुसरी नोटीस शाळेला पाठविण्यात आली. यानंतरही शाळा व्यवस्थापनाने मनमानी सुरू ठेवल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस शिक्षणमंत्र्यांकडे करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत प्रशासनाला सांगण्यात आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. तर, शाळेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शाळेवर काय कारवाई करावी, याबाबत विचार करण्यात येणार आहे, असे अधिकाºयाने सांगितले.

Web Title: The approval of the school will not be accepted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.