स्वबळावर भगवा फडकवा, रामदास कदम यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 02:29 AM2018-10-23T02:29:42+5:302018-10-23T02:29:54+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.

 Appeal to the saffron flag and Ramdas Kadam on Swab | स्वबळावर भगवा फडकवा, रामदास कदम यांचे आवाहन

स्वबळावर भगवा फडकवा, रामदास कदम यांचे आवाहन

Next

मुंंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी मुंबईत बुथ स्तरावर जोरदार तयारी सुरू आहे. रविवारी रात्री दहिसर येथील शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी आगामी निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी भगवा फडकावण्यासाठी अहोरात्र मेहनत करा, असे आवाहन केले.
आगामी निवडणुका नजरेसमोर ठेऊन शिवसेना विभाग क्रमांक १च्या वतीने ‘लक्ष २०१९’ या शीर्षकाखाली दहिसर विधानसभेतील गटप्रमुखांचा मेळावा रविवारी रात्री दहिसर विद्यामंदिर येथे आयेजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रामदास कदम बोलत होते. या वेळी ७०० पुरुष व महिला गटप्रमुख उपस्थित होते.
रामदास कदम पुढे म्हणाले, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून गेलेला हा दहिसर विधानसभेचा गड यंदा आपण पुन्हा जिंकलाच पाहिजे. त्यासाठी शिवसैनिकांनी मतभेद विसरून कामाला लागा, असेही आवाहन त्यांनी केले.
खासदार अरविंद सावंत म्हणाले, गटप्रमुखांनी शिवसेनेची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

Web Title:  Appeal to the saffron flag and Ramdas Kadam on Swab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.