रस्ते घोटाळ्याचा दुसरा अहवाल अद्याप गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:23 AM2018-02-08T02:23:37+5:302018-02-08T02:23:48+5:30

रस्ते घोटाळ्याचा पहिला अहवाल ब-याच विलंबानंतर समोर आला. मात्र, चौकशीच्या दुस-या टप्प्यातील अहवाल मुदत संपल्यानंतरही अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Another report of the road scam is still in the bouquet | रस्ते घोटाळ्याचा दुसरा अहवाल अद्याप गुलदस्त्यात

रस्ते घोटाळ्याचा दुसरा अहवाल अद्याप गुलदस्त्यात

Next

मुंबई : रस्ते घोटाळ्याचा पहिला अहवाल ब-याच विलंबानंतर समोर आला. मात्र, चौकशीच्या दुस-या टप्प्यातील अहवाल मुदत संपल्यानंतरही अद्याप गुलदस्त्यातच आहे. हा अहवाल काही दिवसांतच सादर करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत आज दिले. मात्र रस्ते घोटाळ्याच्या चौकशीच्या पहिल्या टप्प्यातील अहवाल अद्याप नगरसेवकांच्या हातात पडलेला नाही. त्यामुळे हा अहवाल महापौरांनी दडपला असल्याचा संशय भाजपने व्यक्त केला आहे.
पहिल्या टप्प्यातील ३४ रस्त्यांच्या चौकशीचा अहवाल जानेवारी महिन्याच्या दुसºया आठवड्यात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना सादर केला. त्याचवेळा ३१ जानेवारीपर्यंत दोनशे रस्त्यांच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र अद्याप हा अहवाल सादर झालेला नाही. रस्ते दुरूस्तीच्या १४७ कोटी रुपयांच्या प्रस्तावावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याकडे लक्ष वेधले.
घोटाळ्याच्या चौकशीचा पहिला अहवाल अद्याप नगरसेवकांना मिळालेला नाही. तर दुसरा अहवाल सादर केलेला नाही, यावर भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पहिल्या घोटाळ्याचा अहवाल महापौरांनी दडपलाय का? असा प्रश्न भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी उपस्थित केला. येत्या काही दिवसांत अंतिम अहवाल सादर करु, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी यावेळी दिले.
११ ठेकेदार दोषी : पहिल्या टप्प्यात ३४ रस्त्यांच्या चौकशीत तब्बल ९४ अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले आहेत. तर, सहा ठेकेदारांवरही कारवाई करण्यात येणार आहे. दुसºया टप्प्यात दोनशे रस्त्यांच्या प्राथमिक चौकशीत ११ ठेकेदार दोषी आढळले आहेत.
प्रशासनाची परस्पर भूमिका
ए प्रभागातील २६ रस्त्यांच्या दुरूस्तीला आॅक्टोबर महिन्यात मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात कामे सुरु झालेली नाहीत, असा आरोप शिवसेनेच्या सुजाता सानप यांनी केला. तर, स्थायी समितीने मंजूर केलेली कामे प्रशासन परस्पर रद्द करत आहे. त्याबाबतही प्रशासनाकडे खुलासा मागण्यात आला. यावर भविष्यातील विकास कामांचा आढावा घेऊन हे रस्ते रद्द करण्यात आल२ आहे; असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.

Web Title: Another report of the road scam is still in the bouquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.