... आणि बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन फिक्स झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 12:15 PM2018-06-20T12:15:27+5:302018-06-20T12:17:33+5:30

बाळासाहेबांनी सामान्य माणसाला सुपरमॅन बनवले. जर महात्मा गांधींनंतर एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर रेखाटले जावे तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचेच, असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.

... and Nawazuddin was fixed for the role of Balasaheb | ... आणि बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन फिक्स झाला

... आणि बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन फिक्स झाला

Next

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 52 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाप्रीत्यर्थ खासदार संजय राऊत, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कार्निवल ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. श्रीकांत भासी यांनी राऊटर्स एन्टरटेन्मेंटच्या मेगामुव्हीच्या सेटवर एकत्र भेटून दर्जेदार वेळ घालवत चित्रपट व इतर अनेक गोष्टींवर चर्चा केली.
बाळासाहेबांनी सामान्य माणसाला सुपरमॅन बनवले. जर महात्मा गांधींनंतर एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर रेखाटले जावे तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचेच, असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले. दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी 'ठाकरे' या चित्रपटासाठी अभिनेता म्हणून नवाजुद्दीनचा चेहरा डोळ्यासमोर समोर आणला. मला माहित होते की नवाज भाई अगदी योग्य होता. पण जेव्हा आमची पहिली मिटिंग होती आणि नवाज समोरून चालत येताना मी पाहिलं तेव्हा लगेच तो बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यात फिक्स झाला, असेही संजय राऊत म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावर चित्रपट बनतोय आणि आपल्याला त्या चित्रपटाचा एक भाग बनण्यास मिळतोय हे समजताच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी आपलया इतर सर्व चित्रपटांच्या तारखा व शेड्युल बदलले. बाळासाहेबांबद्दल सांगताना नवाजुद्दीन म्हणाला की, बाळासाहेब ठाकरे हे एक पारदर्शी व्यक्तिमत्व होते ज्यांनी सर्वसामान्य माणसांना सामर्थ्य दिले आणि आजीवन अनुभव देणारे निबंध लिहून ठेवले. 'ठाकरे' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नवाजुद्दीनने मान्य केले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारण्याऱ्या शिवधनुष्याचा भर पेलवण्याच्या विचारांत आजही त्याच्या अनेक रात्री न झोपता जातात. 
कार्निव्हल ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. श्रीकांत भासी म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे एक वाघ आहेत, ज्यांनी राष्ट्र घडविण्यासाठी अनेक वादळांची शिकार केली. त्यांच्यासारखे तेच! त्यांची सर इतर कोणालाच नाही. संजय राऊत या चित्रपटाची निर्मिती करीत असून नवाजुद्दीन सिद्दीकी सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व 'ठाकरे' चित्रपटाला लाभल्यामुळे त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. 'ठाकारे' चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांच्या मनात उत्सुकता दाटून आली असून हा चित्रपट 2019 च्या सर्वाधिक प्रलंबीत चित्रपटांपैकी एक आहे. यात काही शंकाच नाही.

Web Title: ... and Nawazuddin was fixed for the role of Balasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.