...अन् बेबी पेंग्विनचा जन्मकाळ होणार अजरामर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 04:29 AM2018-08-19T04:29:33+5:302018-08-19T04:30:08+5:30

पालिका माहितीपट तयार करणार; अंड्याचे कवच करणार जतन

... and baby penguins will be born forever! | ...अन् बेबी पेंग्विनचा जन्मकाळ होणार अजरामर!

...अन् बेबी पेंग्विनचा जन्मकाळ होणार अजरामर!

googlenewsNext

मुंबई : परदेशी पाहुण्याच्या जन्माचे साक्षीदार असलेले भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई प्राणिसंग्रहालय संपूर्ण देशात एकमेव ठरले आहे. त्यामुळे हा क्षण अजरामर बनविण्यासाठी आता पेंग्विनच्या जन्मावर एक माहितीपट काढण्याचा राणीबागेतील अधिकाऱ्यांचा विचार आहे. तसेच संशोधनासाठी पेंग्विनच्या अंड्याचे कवचही जतन करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्य दिनी रात्री राणीच्या बागेत जन्माला आलेले नवजात पेंग्विन संपूर्ण देशाचे आकर्षण ठरत आहे. या परदेशी पाहुण्याच्या जन्माची कथा मुंबईकरांना पाहता यावी, यासाठी राणीबागेतील पेंग्विन कक्षात असलेले सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करण्यात येत आहे. त्यानंतर या सीसीटीव्हीच्या आधारे या नव्या पाहुण्याचा माहितीपट तयार होऊ शकेल. त्याचबरोबर ज्या अंड्यातून हे पिल्लू बाहेर आले, त्याचा अभ्यासही करण्यात येत असून, हे कवच नागरिकांनाही पाहता येणार आहे.
गेल्या वर्षी राणीच्या बागेतील पेंग्विनचे आगमन, परदेशात आपले घर तयार करण्यासाठी वातावरणाशी जुळून घेण्याची त्यांची धावपळ, त्यांनी निवडलेले जोडीदार असे सर्व चित्रीकरण संशोधनासाठी उपलब्ध होऊ शकते.
गेल्या वर्षी दीड वर्षीय मादी पेंग्विनच्या मृत्यूनंतर राणीबागेतील कर्मचाºयांवर टीकेची झोड उठली होती. मात्र, राणीबागेतील कर्मचाºयांनी या पेंग्विनसाठी घेतलेली मेहनत संपूर्ण जगासमोर यावी, यासाठी हा माहितीपट काढावा, असे काही अधिकाºयांना वाटते.
मात्र, अद्याप यावर केवळ चर्चा सुरू असल्याने अधिकृत माहिती देण्यास राणीबागेतील अधिकारी तयार नाहीत.

बाळाचे वजन वाढतेय
जन्माला आल्यानंतर ७५ ग्रॅम असलेल्या या पिल्लाचे वजन हळूहळू वाढत आहे. त्याची प्रकृती व त्याची वाढ यावर राणीबागेतील पशू वैद्यकीय अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत. सध्या हे पिल्लू करड्या रंगाचे आहे. दोन वर्षांत त्यात बरेच बदल होतील.

बच्चेकंपनीची निराशा
अवघ्या चार दिवसांच्या बेबी पेंग्विनला पाहण्यासाठी बच्चेकंपनीची झुंबड उडत आहे. मात्र, सध्या या पिल्लाला आईवडिलांची ऊब हवी असून ते स्वत: अन्न खाण्यास शिकल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी मुंबईकरांना त्याला पाहता येणार आहे.

डीएनए चाचणीला लागणार वेळ
हे पिल्लू नर की मादी हे अद्याप कळू शकलेले नाही. त्यासाठी डीएनए चाचणी आवश्यक असून ती बंगळुरू येथील प्रयोगशाळेत होणार आहे. मात्र, सध्या या पिल्लाची प्रकृती उत्तम असणे आवश्यक असल्याने चाचणीबाबत अद्याप घाई करण्यात आलेली नाही.

बबलसाठी जोडीदाराचा शोध सुरू
राणीबागेत आलेल्या तीन नर व पाच मादी पेंग्वीनपैकी एकीचा मृत्यू झाला. तर अन्य तिघांनी आपले जोडीदार निवडले. मात्र तीन वर्षांच्या ‘बदल’ला संवगडीच नाही. खरतर तिच्याच वयाच्या मॉल्टबरोबर तिचे सूत जुळतील असे वाटत होते. मात्र, मॉल्टने साडेचार वर्षांच्या फिल्परमध्ये जोडीदार शोधला. यामुळे बबल एकटीच पडली आहे. तिलाही तिचा जोडीदार मिळावा यासाठी राणी बागेत दोन नर आणि एक मादा पेंग्विन आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: ... and baby penguins will be born forever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई