दंडाची रक्कम ५ हजारांहून दोनशे रुपये करावी, मुंबई पालिकेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 06:05 AM2018-06-20T06:05:26+5:302018-06-20T06:05:26+5:30

प्लॅस्टिकची पिशवी बाळगल्याप्रकरणी पाच हजार रुपयांऐवजी दोनशे रुपये दंड आकारण्याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधि आणि स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला आहे.

Amount of penalty should be made from 5000 to 200 rupees, Mumbai Municipal proposal | दंडाची रक्कम ५ हजारांहून दोनशे रुपये करावी, मुंबई पालिकेचा प्रस्ताव

दंडाची रक्कम ५ हजारांहून दोनशे रुपये करावी, मुंबई पालिकेचा प्रस्ताव

Next

मुंबई : प्लॅस्टिकची पिशवी बाळगल्याप्रकरणी पाच हजार रुपयांऐवजी दोनशे रुपये दंड आकारण्याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधि आणि स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला आहे. दोन्ही समित्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडला जाईल आणि राज्य सरकारने त्यास मंजुरी दिली तरच दंडाची रक्कम मुंबईपुरती २०० रुपये असणार आहे.
२३ जूनपासून राज्यभरात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू होईल. यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांसोबतच वन टाइम युज प्लॅस्टिक म्हणजेच ज्याचा पुनर्वापर होऊ शकत नाही, असे प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई होईल. तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी बाळगली तर तुम्हाला पाच हजार दंड भरावा लागणार आहे.
दरम्यान, प्लॅस्टिकमुळे होणारा वाढता कचरा, प्रदूषण पाहता महापालिका कठोर कारवाई करणार आहे. दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल यांचा समावेश असेल. संबंधितांकडे बंदी असलेले प्लॅस्टिक आढळले तर त्यांना दंड होऊ शकतो. दंडाची रक्कम पाच हजार असली तरी सर्वसामान्यांसाठीचा हा दंड दोनशे रुपयांपर्यंत कमी करण्यात यावा, याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधिसह स्थायी समितीत मांडण्यात आला आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतरच सर्वसामान्यांसाठी असलेल्या दंडाची रक्कम निश्चित होऊ शकेल.

Web Title: Amount of penalty should be made from 5000 to 200 rupees, Mumbai Municipal proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.