सोसायट्यांमध्ये माघी गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण, गणेश मंडळांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 04:00 AM2019-02-08T04:00:01+5:302019-02-08T04:00:49+5:30

आजपासून माघ महिन्यातील माघी गणेश सोहळा सुरु झाला असूनभाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव मंडळात ज्याप्रमाणे मोठमोठे सेट्स व देखावे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, आकर्षक गणेशमुर्ती हा ट्रेन्ड आता माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळामध्येही दिसून येत आहे.

Among the societies, the magnificent atmosphere of Maghi Ganeshotsav, the number of Ganesh Mandals increased | सोसायट्यांमध्ये माघी गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण, गणेश मंडळांची संख्या वाढली

सोसायट्यांमध्ये माघी गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण, गणेश मंडळांची संख्या वाढली

Next

मुंबई  - आजपासून माघ महिन्यातील माघी गणेश सोहळा सुरु झाला असूनभाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव मंडळात ज्याप्रमाणे मोठमोठे सेट्स व देखावे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, आकर्षक गणेशमुर्ती हा ट्रेन्ड आता माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळामध्येही दिसून येत आहे. मात्र, आता मोठ-मोठी मंडळे आणि सोसायटीमध्ये गणपती सोहळ््यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
यावर्षी २ हजार ८०० च्यावर गणेश मंडळे गेली आहेत. यात काही गणपती दीड दिवसांचे बसतात. काही गणपतींचे पाचव्या व सातव्या दिवसी विसर्जन केले जाते. परंतु काही मंडळे रजिस्टर आहेत. इतर गणपती छोट्या-मोठ्या सोसायट्यामध्ये (घरगुती) बसविले जातात. सध्या लोकांचा विश्वास वाढत चालला आहे. त्यामुळे गणेश मंडळांची वर्षांनुवर्षे संख्या वाढत आहे. शासनाचे सर्व नियम मंडळांना लागू आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली.
शाडू मूर्तीकार प्रदीप मादूस्कर म्हणाले की, आपल्याकडे एकत्र कुंटूंूब पद्धती अजूनही असल्यामुळे काहींना भाद्रपद महिन्यात गणपती आणता येत नाही. त्यामुळे माघी गणेश सोहळ््यात गणपती आणला जातो. माघी गणपती सुरुवातीला दोन वर्षांसाठी आणला जातो. परंतु काही जण पुढे ती परंपरा सुरुच ठेवतात. भाद्रपद महिन्यात सगळ््यांकडे गणपती असल्यामुळे एकमेकांकडे जायला मिळत नाही. माघी गणपती ठेवला, तर चार माणसे दर्शनासाठी येऊ शकतात, असेही कारण असू शकते. काही जण हौसेखातर माघी गणपती बसवतात. ९२-९३ सालामध्ये दोन-तीन गणपती होते. मात्र, आता ३० च्या घरात संख्या पोहोचली आहे. शाडूच्या मूर्तीची ही मागणी जास्त असते.

महिलांचे ढोलताशा पथक ‘श्रीं’च्या आगमनासाठी
सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. भजन, संगीत मैफल, सनई वादन, कीर्तन, अथर्वशीर्ष पठण असे अनेक कार्यक्रम मंदिरात आयोजित करण्यात आले आहेत. यंदा सिद्धिविनायक मंदिरामध्ये विशेष आकर्षण म्हणून ८ फेब्रुवारी रोजी महिलांचे वाद्यवृंद पथक ‘सामना ढोलताशा पथक’ वाद्य कला सादर करणार आहे.
कुर्ला येथील राजे शिवाजी मित्र मंडळाचा ‘सुंदरबागचा चिंतामणी’, जोगेश्वरीतील श्रीमान योगी मित्र मंडळाचा माघी गणेश जयंती उत्सव, चारकोपचा सम्राट मित्र मंडळाचा ‘चारकोपचा सम्राट’, आंगणेवाडीचा गणपती, गिरगावातील बाटवडेकरवाडीचा सार्वजनिक गणपती, खोताचीवाडी गिरगाव, अंधेरी-कुर्ला रोड, पवई, भांडूप, कुंभारवाडा इत्यादी ठिकाणी माघी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे

Web Title: Among the societies, the magnificent atmosphere of Maghi Ganeshotsav, the number of Ganesh Mandals increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.