बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना हवाय जॉब, ट्विटरवर अपलोड केला बायोडेटा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 01:28 PM2018-02-19T13:28:13+5:302018-02-19T13:44:09+5:30

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर नोकरीची मागणी करत आपला बायोडेटाच अपलोड केला आहे.

Amitabh Bachchan seeking jobs on twitter | बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना हवाय जॉब, ट्विटरवर अपलोड केला बायोडेटा 

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना हवाय जॉब, ट्विटरवर अपलोड केला बायोडेटा 

googlenewsNext

मुंबई - बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर नोकरीची मागणी करत आपला बायोडेटाच अपलोड केला आहे. अमिताभ बच्चन यांनी एक पेपर कटिंगचा फोटो ट्विटरवर  पोस्ट केला आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ या दोन्ही अभिनेत्रींची शारीरिक उंची आमीर खान आणि शाहिद कपूर यांच्या उंचीनुसार अधिक असल्यानं त्यांची जोडी विचित्र दिसते, असे म्हटले गेले आहे. यावर बोलताना बिग बी अमिताभ यांनी दीपिका व कतरिनासोबत काम करण्यास फिट असल्याचं सांगत माझी उंची चांगली असल्याचंही म्हटले आहे. 

अतिशय गांभीर्यानं आपला बायोडेटा ट्विटरवर अपलोड करुन अमिताभ बच्चन जॉबची मागणी करत आहेत, असे तुम्हाला वाटत असेल. तर तसे अजिबात नाहीय. खरंतर अमिताभ बच्चन यांनी मिश्किल अंदाजात हे ट्विट केलेले आहे. अमिताभ यांनी शनिवार ट्विट केले आहे की, "जॉब एप्लिकेशन : नाम अमिताभ बच्चन, जन्म तिथि : 11.10.1942, इलाहबाद, उम्र : 76, योग्यता : पिछले 49 साल में लगभग 200 फिल्मों में काम किया, भाषा ज्ञान : हिंदी, अंग्रेजी, पंजाबी और बांग्ला, लंबाई : 6 फीट 2 इंच, उपलब्धि : आपको लंबाई की कोई समस्या नहीं होगी।" दरम्यान, अमिताभ बच्चन सध्या '102 नॉट आउट', 'ब्रह्मास्त्र' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत.  

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवर आमिर खान आणि शाहिद कपूर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं मजेशीर ठरेल.  दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी पीकू सिनेमामध्ये दीपिका पादुकोणच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. तर 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' सिनेमामध्ये ते दीपिकासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.  




'ब्रह्मास्त्र'साठी आलिया बल्गेरियामध्ये 
अभिनेत्री आलिया भट्ट आपला आगामी सिनेमा 'ब्रह्मास्त्र' साठी बल्गेरियामध्ये दाखल झाली आहे.  याबाबतची माहिती तिनं इन्स्टाग्रामवर दिली होती. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमामध्ये अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यांचा रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबतचा हा पहिलाचा सिनेमा आहे. 15 ऑगस्ट 2019ला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.  

Web Title: Amitabh Bachchan seeking jobs on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.