Amitabh Bachchan admitted to Lilavati Hospital | अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई - बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमके कोणत्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  

शुक्रवारी संध्याकाळी अमिताभ बच्चन यांना  लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र रुग्णालयाच्या सूत्रांकडे विचारणा केल्यावर अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी उठत असलेल्या वावड्यांना पूर्णविराम मिळाला.
अमिताभ बच्चन हे सध्या ठग्ज ऑफ हिंदुस्थान या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहेत. त्यादरम्यान ते आज संध्याकाळी लीलावती रुग्णालयात आपल्या नियमित तपासणीसाठी गेले होते.. मात्र पाठीचा कणा आणि मानेमध्ये तीव्र वेदना होत असल्याने अमिताभ यांना रुग्णालयाचा दाखल करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये पसरले होते. पण या दुखण्यामुळे अमिताभ बच्चन हे बऱ्याच काळापासून त्रस्त असून, ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात येत असतात.