युतीसाठी भाजपाची पळापळ, अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून घातली गळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 05:02 PM2019-01-30T17:02:16+5:302019-01-30T17:10:22+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही परिस्थितीत राज्यात शिवसेनेसोबत युती झाली पाहिजे यासाठी भाजपा नेत्यांना जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

Amit Shah talk with Uddhav Thackeray about Yuti | युतीसाठी भाजपाची पळापळ, अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून घातली गळ 

युतीसाठी भाजपाची पळापळ, अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून घातली गळ 

ठळक मुद्देआगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही परिस्थितीत राज्यात शिवसेनेसोबत युती झाली पाहिजे यासाठी भाजपा नेत्यांना जोरदार हालचाली सुरू केल्या आहेतयुतीसाठी राज्य स्तरावर प्रयत्न सुरू असतानाच आता खुद्द भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधत युतीबाबत चर्चा केली आहेअमित शहा यांनी युतीबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना केल्याचे वृत्त

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही परिस्थितीत राज्यात शिवसेनेसोबत युती झाली पाहिजे यासाठी भाजपा नेत्यांना जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. युतीसाठी राज्य स्तरावर प्रयत्न सुरू असतानाच आता खुद्द भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधत युतीबाबत चर्चा केली आहे. 

राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपा हे स्वतंत्रपणे लढल्यास त्यातून होणाऱ्या मतविभागणीचा  फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत युती झालीच पाहिजे यासाठी भाजपा नेत्यांकडून हालचाली सुरू आहेत. त्यासाठी भाजपाकडून लवचिक भूमिका घेण्यात आली आहे. तर आतापर्यंत स्वबळाची भाषा करण्याऱ्या शिवसेनेनेही आपली भूमिका मवाळ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत चर्चा झाली आहे. या चर्चेवेळी अमित शहा यांनी युतीबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे युतीबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

Web Title: Amit Shah talk with Uddhav Thackeray about Yuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.