पत्रकारांचे प्रश्र टाळून अमित शहा अन् उद्धव ठाकरेंनी उरकली पत्रपरिषद!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 06:44 AM2019-02-19T06:44:07+5:302019-02-19T06:45:41+5:30

दिलजमाई : घोषणा करणयाआधीच ठरली होती रणनीती

Amit Shah and Uddhav Thakarnei resigns from the presspersons of the journalists. | पत्रकारांचे प्रश्र टाळून अमित शहा अन् उद्धव ठाकरेंनी उरकली पत्रपरिषद!

पत्रकारांचे प्रश्र टाळून अमित शहा अन् उद्धव ठाकरेंनी उरकली पत्रपरिषद!

Next

मुंबई : गेली चार-साडेचार वर्षे सत्तेत एकत्र राहूनही विरोधकांहूनही अधिक त्वेषाने परस्परांवर तुटून पडणाऱ्या भाजपा-शिवसेना नेत्यांनी पुन्हा दिलजमाईची घोषणा करण्याआधी तोंड कसे लपवायचे याची रणनीती तयार केली होती.

अमित शहाउद्धव ठाकरे यांच्या पातळीवर युती करायची हे ठरल्यावर ते आपापल्या पक्षातील इतरांच्या पचनी पाडण्याचे काम आधी केले गेले. त्यासाठी पत्रकार परिषदेपूर्वी बीकेसीमधील एका हॉटेलात भाजपाची तर ‘मातोश्री’वर शिवसेनेची बैठक झाली. त्यानंतर अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’वर गेले. तेथे पत्रकार परिषदेची रणनीती ठरविली गेली. पत्रकारांना प्रश्न विचारू द्यायचे नाहीत, हे त्यातील मुख्य सूत्र होते. त्यानुसार शहा व ठाकरे यांची पत्रकार परिषद असूनही युती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. नंतर शहा व ठाकरे यांनी आपले मनोगत थोडक्यात मांडले आणि पत्रकारांचे सर्व प्रश्न त्यांच्या मनातच ठेवून सर्व नेते मंडळी हात जोडून उठून निघून गेली

पालघरची जागा शिवसेनेला
भाजपा-शिवसेना युतीचे घोडे पालघर लोकसभा मतदारसंघावर अडले होते. मात्र, ही जागा पदरात पाडून घेण्यात सेनेला यश मिळाले. पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली गेली नाही, मात्र पालघरची जागा सेनेला सोडण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त भागात एकत्रितपणे फिरणार
भाजपा-शिवसेनेचे नेते प्रचारासाठी एकत्रित फिरतीलच पण त्या आधी लगेच दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील समस्या जाणून घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र परिषदेत जाहीर केले.

Web Title: Amit Shah and Uddhav Thakarnei resigns from the presspersons of the journalists.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.