ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढतोय स्मृतिभ्रंशाचा आजार, जागतिक अल्झायमर जनजागृती दिन, भारतात गांभीर्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 02:51 AM2017-09-21T02:51:21+5:302017-09-21T02:51:24+5:30

भारतामध्ये आजही ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण व त्यांचे नातेवाईक हा आजार गांभीर्याने घेत नाहीत. स्मृतिभ्रंश हा आजार वयानुसार वाढत जातो.

Alzheimer's Disease, Sense of Increasing Disease in Senior Citizens, Says World Alzheimer's Day | ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढतोय स्मृतिभ्रंशाचा आजार, जागतिक अल्झायमर जनजागृती दिन, भारतात गांभीर्य नाही

ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढतोय स्मृतिभ्रंशाचा आजार, जागतिक अल्झायमर जनजागृती दिन, भारतात गांभीर्य नाही

Next

मुंबई : भारतामध्ये आजही ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण व त्यांचे नातेवाईक हा आजार गांभीर्याने घेत नाहीत. स्मृतिभ्रंश हा आजार वयानुसार वाढत जातो. अल्झायमर आजाराच्या सुरुवातीस निदान करणे कठीण असते. वयोपरत्वे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. वार्धक्य व आनुवंशिकता, यामुळे हा अजार होण्याची शक्यता असते. हा आजार प्रतिबंधक उपचारांनी दूर ठेवू शकतो. म्हणजेच वयाची साठी उलटल्यानंतर जीवनपद्धतीत बदल करून
घेतला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
जागतिक अल्झायमर जनजागृती दिनाच्या पार्श्वभूमीवर मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष हस्तक यांनी सांगितले की, भारतात आलेल्या आधुनिक वैद्यकीय क्रांतीमुळे भारतीयांचे जीवनमान ८०च्या पुढे जात असून, या वयातील लोकसंख्येच्या ४० टक्के लोक या आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता आहे, परंतु या आजारावर प्रतिबंध म्हणून नित्य नवे विषय समजून घेणे, समजलेले स्मरण, चिंतन करणे, दुसºयास समजावून देणे, लाफ्टर क्लबमध्ये जाणे, सहलीस जाणे, विश्वासू व्यक्तीच्या मदतीने पैशांचे व्यवहार करणे, असे विविध उपचार करण्याने, आपल्या मेंदूमधील संबंधित चेतापेशींना चांगला व्यायाम घडून त्या कार्यक्षम राहतात.
या आजाराविषयी सांगताना, डॉ. हस्तक म्हणाले की, अल्झायमर आजारात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. त्या व्यक्तीला निरनिराळे भास होतात. मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते. वाचणे, लिहिणे, बोलणे, चालणे यांची क्षमता कमी होत जाते. नैसर्गिक विधीही समजत नाहीत. त्यामुळे त्यावरचे नियंत्रणही जाते. शेवटी स्नायू ºहासामुळे सर्व हालचाली मंदावतात व रुग्ण बिछान्यात पडून राहतो. सध्या जगभर माणसाची सरासरी आयुमर्यादा वाढल्यामुळे, ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. सामान्यपणे ८० वर्षांवरील ५० टक्के वृद्ध अल्झायमरग्रस्त असल्याचे आढळून येतात, अशी माहिती डॉ. हस्तक यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात अल्झायमर व संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या ४८ दशलक्ष एवढी झाली असून, ही संख्या दर २० वर्षांनी दुप्पट होऊ शकते. एकट्या भारतात साडेचार दशलक्ष लोकांमध्ये अल्झायमरचा एखादा प्रकार आढळून आला आहे. हा आजार वयाच्या तिसाव्या वर्षीदेखील होऊ शकतो, परंतु सहसा साठीनंतर या आजाराचे निदान होते; तसेच वाढत्या वयाबरोबर हा आजार होण्याचा धोका वाढतो.

Read in English

Web Title: Alzheimer's Disease, Sense of Increasing Disease in Senior Citizens, Says World Alzheimer's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.