हार्बर मार्गावरील सर्व लोकल आता सिमेन्स बनावटीच्या, वेग वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 07:01 AM2019-06-26T07:01:15+5:302019-06-26T07:01:44+5:30

हार्बर मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या जुन्या प्रकारातील रेट्रोफिटेड बनावटीच्या सर्व लोकल बाद झाल्या आहेत. आता हार्बर मार्गावर सर्व लोकल सिमेन्स बनावटीच्या असणार आहेत.

All locals on the harbor route will now be able to build simulations, speed up | हार्बर मार्गावरील सर्व लोकल आता सिमेन्स बनावटीच्या, वेग वाढणार

हार्बर मार्गावरील सर्व लोकल आता सिमेन्स बनावटीच्या, वेग वाढणार

googlenewsNext

मुंबई - हार्बर मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या जुन्या प्रकारातील रेट्रोफिटेड बनावटीच्या सर्व लोकल बाद झाल्या आहेत. आता हार्बर मार्गावर सर्व लोकल सिमेन्स बनावटीच्या असणार आहेत. पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचल्यास सिमेन्स बनावटीच्या लोकल यातून मार्गक्रमण करू शकतात. त्यामुळे यंदा पावसाळ्यात लोकल सेवा विस्कळीत होणार नसल्याचा दावा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

हार्बर मार्गावर ४० लोकल आहेत. यापैकी ३६ लोकल सिमेन्सच्या होत्या, तर चार रेट्रोफिटेड होत्या. मात्र रेट्रोफिटेड प्रकारातील लोकल बाद करून आता ४० लोकल सिमेन्स प्रकारच्या चालविण्यास सुरुवात केली आहे. या लोकलच्या ६१२ फेºया चालविण्यात येतात. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना लोकलमध्ये हवेशीर वातावरण मिळणार आहे.

सिमेन्स बनावटीच्या लोकलमुळे हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढेल. त्यामुळे दोन स्थानकांतील अंतर कमी वेळेत पार होईल. परिणामी हार्बर मार्गावर जादा फेºया होतील. त्या लवकरच वेळापत्रकात समाविष्ट करता येईल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी व्यक्त केला.

केवळ ट्रान्स हार्बर मार्गावरच जुन्या लोकल

सिमेन्स कंपनीच्या लोकलचा वेग ८० ते १०० किमी आहे. यात प्रवाशांची क्षमता, पकडण्याजोगे हँडल असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे. सिमेन्स लोकलची बांधणी आधुनिक पद्धतीची असल्यामुळे खिडक्या आणि दरवाजे मोठ्या आकाराचे असतील. जुन्या प्रकारातील लोकल भंगारात जाण्याची शक्यता आहे. तर काही लोकल या ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यात येतील. यासह पावसाळ्यात चिखल उचलण्यासाठी व इतर कामासाठी या गाड्यांचा वापर करता येईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली. दरम्यान, आता हार्बर मार्गावर सर्व लोकल सिमेन्स बनावटीच्या असतील. त्यामुळे आता केवळ ट्रान्स हार्बर मार्गावरच जुन्या रेट्रोफिटेड प्रकारातील लोकल धावत आहेत.
 

Web Title: All locals on the harbor route will now be able to build simulations, speed up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.