विमान प्रवासी वा-यावर, वाहतूक मात्र पूर्वपदावर, ५०० पेक्षा जास्त प्रवाशांची असुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 05:52 AM2017-09-22T05:52:29+5:302017-09-22T05:52:33+5:30

मुसळधार पाऊस आणि खासगी कंपनीचे विमान घसरून चाक चिखलात रुतल्याने खंडित झालेली हवाई वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली आहे. बुधवारी रात्री रुतलेल्या विमानाचे चाक बाहेर काढल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने रन-वेची पाहणी केली.

On air travel, on the pre-departure of the traffic, the inconvenience of more than 500 passengers | विमान प्रवासी वा-यावर, वाहतूक मात्र पूर्वपदावर, ५०० पेक्षा जास्त प्रवाशांची असुविधा

विमान प्रवासी वा-यावर, वाहतूक मात्र पूर्वपदावर, ५०० पेक्षा जास्त प्रवाशांची असुविधा

Next

मुंबई : मुसळधार पाऊस आणि खासगी कंपनीचे विमान घसरून चाक चिखलात रुतल्याने खंडित झालेली हवाई वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली आहे. बुधवारी रात्री रुतलेल्या विमानाचे चाक बाहेर काढल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने रन-वेची पाहणी केली. एअर इंडिया वगळता अन्य कंपन्यांची विमान वाहतूक बुधवारी रात्री उशिरा सुरू करण्यात आली. एअर इंडियाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे ५००हून जास्त प्रवाशांना विमानतळावर नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे सेवांप्रमाणे विमानसेवा बाधित झाली. याचा परिणाम गुरुवारीदेखील दिसून आला. रात्री उशिरा रन-वेची सफाई झाल्यानंतर विमान उड्डाणांसाठी रन-वे खुला करण्यात आला. या वेळी एअर इंडिया वगळता अन्य कंपन्यांची सेवा सुरूझाली. मात्र एअर इंडियाची विमान वाहतूक ठप्पच होती. एअर इंडियाचा कोणताही अधिकारी विमानतळावर उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप वाढला. विमानतळावरील एअर इंडियाच्या काउंटरवरूनही माहिती उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांनी ‘एअर इंडिया हाय-हाय’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
मुंबई येथून बाहेरगावी उड्डाण करणारी बहुतांशी विमाने रद्द झाल्यामुळे ५००हून अधिक प्रवाशांचा खोळंबा झाला होता. तिकिटाचे पैसे परत करा, अशी मागणी प्रवाशांकडून विमानतळावरील काउंटरवर
असणाºया कर्मचाºयांकडे करण्यात
येत होती. गुरुवारीदेखील एअर इंडियाची काहीअंशी विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
>एअर इंडियाची ‘कंजुसी’
एअर इंडियाची अनेक उड्डाणे रद्द झाली, अनेकांना प्रचंड उशीर झाला. या काळात एअर इंडियाने प्रवाशांना साधे जेवणही दिले नाही. देशभरातील विविध विमानतळांवर एअर इंडियाची विमाने तासन्तास उभी होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. याउलट खासगी एअरलाइन्सकडून मात्र प्रवाशांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे चित्र होते. यामुळे ‘आकाशातील तुमचा महाल’ या एअर इंडियाच्या ब्रीदवाक्यालाही काळिमा फासला गेल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती.
>कुठलीच सुविधा पुरविण्यात आली नाही
विमानतळावर एअर इंडियाचा कोणताही अधिकारी उपलब्ध नव्हता, अन्य कंपन्यांची विमान वाहतूक सुरळीत होती. मात्र एअर इंडिया प्रशासनाकडून कोणतीही सुविधा अथवा माहिती पुरवण्यात आली नाही, अशी माहिती प्रवासी दीपक कदम यांनी दिली. या प्रकरणी एअर इंडिया प्रशासनाशी फोन, टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: On air travel, on the pre-departure of the traffic, the inconvenience of more than 500 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.