एअर इंडियाच्या एजंटांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 01:22 AM2018-12-13T01:22:06+5:302018-12-13T01:22:28+5:30

तिकिटे आरक्षणातून वगळल्याचा निषेध; एकाच संस्थेला अधिकार

Air India Agent Warning | एअर इंडियाच्या एजंटांचा आंदोलनाचा इशारा

एअर इंडियाच्या एजंटांचा आंदोलनाचा इशारा

Next

पुणे : विमानांच्या तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी अधिकृत एजंट्सचा मोठा वाटा आहे. एअर इंडियाने विमान तिकीट आरक्षण प्रक्रियेतून एजंटांनाच बाद केले आहे. या पुढे एकवेळ एकाच संस्थेला तिकीट आरक्षित करण्याचा अधिकार देण्याचा विचार एअर इंडिया करीत आहे. मात्र, त्यामुळे इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत एअर इंडियाला फटका बसेल. त्यामुळे देशाच्या हवाई उड्डाण कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने एजंटांनी या निर्णयाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

संगमब्रिज येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील (आरटीओ) एअर इंडियाच्या कार्यालयाजवळ एजंट्स संघटनांचे प्रतिनिधी येत्या शुक्रवारी (दि. १४) सकाळी साडेअकरा वाजता आंदोलन करणार आहेत. सध्याची तिकीट वितरण प्रणाली ही जागतिक पातळीवर स्वीकारली गेली आहे. या माध्यमातूनच विविध विमान कंपन्यांच्या तिकिटांचे आरक्षण केले जाते. मात्र, २०१९ पासून सध्याची तिकीट आरक्षण पद्धती बंद करण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. त्या ऐवजी तिकीट आरक्षणासाठी एकाच संस्थेला तिकीट आरक्षण प्रणाली वापरण्याची मुभा असेल. त्यामुळे सध्याचे वितरक आरक्षण प्रक्रियेतून बाहेर होणार आहेत.

आरक्षणावर परिणाम होणार
एअर इंडियाच्या या निर्णयामुळे विविध ट्रॅव्हल एजंट्सला एअर इंडियाची तिकिटे आरक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे आपोआपच एअर इंडियाच्या तिकीट आरक्षणावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे हळूहळू एअर इंडियाची तिकीट विक्री घटून, त्यांचा महसूलदेखील कमी होईल. त्यांचा महसूल दुसऱ्या एअर कंपन्यांकडे वळेल. एअर इंडिया आधीच अडचणीतून जात आहे. त्यात या निर्णयामुळे त्यांच्या समोरील अडचणीत आणखी वाढ होईल.

राष्ट्रीय कंपनीला तोटा होण्याची शक्यता असल्याने, देशाची हवाई वाहतूक सेवा वाचविण्याच्या उद्देशाने विविध ट्रॅव्हल एजंट्स आंदोलनात सहभागी होत आहेत. ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन आॅफ पुणे, ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन, एंटरप्राईजिंग ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन-वेस्टर्न इंडियाचे प्रतिनिधी यात सहभागी होणार असल्याची माहिती एजंट्स संघटनेकडून देण्यात आली.

Web Title: Air India Agent Warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.