बंद खोलीतील हवा अधिक घातक! एओएचची धक्कादायक माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:36 AM2017-12-14T05:36:07+5:302017-12-14T05:36:16+5:30

मुंबईतील तापमानात होणारी घट आणि वाढते प्रदूषण यांच्या एकत्रित परिणामांमुळे श्वसनविकाराला बळी पडणाºया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचे निरीक्षण असोसिएशन आॅफ हॉस्पिटल्स संघटनेने व्यक्त केले आहे.

The air in the closed room is more deadly! The shocking information of the Aoh | बंद खोलीतील हवा अधिक घातक! एओएचची धक्कादायक माहिती 

बंद खोलीतील हवा अधिक घातक! एओएचची धक्कादायक माहिती 

Next

मुंबई : मुंबईतील तापमानात होणारी घट आणि वाढते प्रदूषण यांच्या एकत्रित परिणामांमुळे श्वसनविकाराला बळी पडणाºया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचे निरीक्षण असोसिएशन आॅफ हॉस्पिटल्स संघटनेने व्यक्त केले आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे हिवाळ्यात पंखा किंवा वातानुकूलित यंत्राचा वापर न करताच बंद खोलीत राहणाºया लोकांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येत असल्याचा दावाही संघटनेने केला आहे.
असोसिएशन आॅफ हॉस्पिटल्सचे (एओएच) अध्यक्ष डॉ. पी. एम. भुजंग म्हणाले की, हवेतील थंडी वाढत चालली असताना हवेचे प्रदूषणही वाढत आहे. परिणामी, श्वसनविकार होणाºया रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे एओएचमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. या समस्यांमध्ये अस्थमा, पडसे, श्वासोच्छ्वासाच्या समस्या, छातीत जड वाटणे, शिंका येणे, अ‍ॅलर्जी यांसारख्या त्रासाचा समावेश असतो. आपण पिण्याचे पाणी योग्य प्रकारे निवडू शकतो; पण, श्वासावाटे शरीरात जाणाºया हवेवर मात्र नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यात खोलीअंतर्गत हवेतील प्रदूषणाला बाहेरील प्रदूषणाची जोड लाभल्यानंतर, एकूण हवेचे प्रदूषण हे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक ठरते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि श्वसनविकार असलेले रुग्ण यांना हवेतील प्रदूषणाचे फार वाईट परिणाम भोगावे लागतात. हृदयविकार किंवा दीर्घकालीन श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरी सल्ला घ्यावा व बाह्य वातावरणातील कामांवर नियंत्रण ठेवावे.
बंद खोल्यांमधील हवा ही खुल्या वातावरणातील हवेपेक्षा पाच पट किंवा त्याहूनही अधिक प्रदूषित असल्याचे अनेक संशोधनांत उघड झाल्याचे हवा प्रदूषणातील तज्ज्ञ गिरीश बापट यांनी सांगितले. बापट म्हणाले की, घरातील स्वच्छतेसाठी वापरली जाणारी रसायने, घराला देण्यात येणारा रंग, कार्पेट्स आणि स्टेन प्रोटेक्टर्स, चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारे गम, उदबत्त्या आदी गोष्टींमुळे हवाबंद खोल्यामध्ये प्रदूषण होते. हे प्रदूषण तिथेच साचून राहत असल्याची बाब आजही अनेकांच्या ध्यानात येत नाही. खोली अंतर्गत असलेल्या हवेतील प्रदूषणाला बाहेरील प्रदूषणाची जोड लाभल्यानंतर, एकूण हवेचे प्रदूषण हे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक ठरते, असेही संघटनेने स्पष्ट केले.

Web Title: The air in the closed room is more deadly! The shocking information of the Aoh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.