कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे ‘मिशन महाराष्ट्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:28 AM2018-04-22T01:28:17+5:302018-04-22T01:28:17+5:30

विरोधी पक्षांत संयुक्त एकमत सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांत एकवाक्यता पाहायला मिळत आहे.

After Rahul Gandhi's 'Mission Maharashtra' | कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे ‘मिशन महाराष्ट्र’

कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे ‘मिशन महाराष्ट्र’

googlenewsNext

राजेश निस्ताने ।

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मिशन म्हणून महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून काँग्रेसने विभाग-जिल्हानिहाय सुरू केलेले पदाधिकाऱ्यांचे मेळावे अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. गुरुवारीच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात मराठवाडा विभागाचा मेळावा पार पडला. मेच्या दुसºया आठवड्यात कर्नाटकात निवडणुका होत आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश, राज्यस्थान, छत्तीसगडसह चार राज्यांच्या निवडणुका आहेत. २०१९मध्ये महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील. चार राज्यांच्या निवडणुकांपूर्वी राहुल गांधी लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात लक्ष घालणार आहेत. महाराष्ट्राकडून काँग्रेसला मोठ्या आशा आहेत. विदर्भ नेहमीच काँग्रेसचा गड राहिला आहे. संपूर्ण देशातच काँग्रेसची मदार अल्पसंख्याक, दलित, आदिवासी, मागासवर्गीय तसेच या वेळी नोटाबंदी-जीएसटीमुळे पहिल्यांदाच भाजपावर नाराज असलेल्या उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आदी नाराज घटकांवर राहणार आहे.


विरोधी पक्षांत संयुक्त एकमत सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांत एकवाक्यता पाहायला मिळत आहे. शिवसेना सत्तेत सहभागी असूनही भाजपाला टार्गेट करते. तर काँग्रेस-राष्टÑवादी एकजुटीने सत्ताधाºयांना निशाणा बनवित आहे. राहुल गांधी व शरद पवारांच्या दिल्लीतील भेटीने विरोधी पक्षांत संयुक्त एकमत दिसत आहे. गुजरात पॅटर्नमुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचा फायदा महाराष्टÑातही करून घेण्याचा प्रयत्न आहे.

जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक
शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने होत आहेत. काँग्रेसने व्हिजन-२०१९ डोळ्यांपुढे ठेवून जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीही हल्लाबोल यात्रा सर्व जिल्ह्यांत होत आहे. राहुल गांधींच्या दौºयापूर्वी काँग्रेसकडूनसुद्धा विरोधी पक्षांची संयुक्त अथवा स्वतंत्र यात्रा काढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभेत कोण कुठे लढले?
लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीत काँग्रेस २७ तर राष्टÑवादी काँग्रेसने २१ जागा लढविल्या. त्यापैकी अनुक्रमे २ व ४ अशा केवळ ६ जागा आघाडीच्या पदरात पडल्या. तर युतीमध्ये भाजपाने २८ तर शिवसेनेने २० जागा लढल्या. त्यापैकी भाजपाला २३ तर सेनेला १८ जागांवर विजय मिळविता आला.

Web Title: After Rahul Gandhi's 'Mission Maharashtra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.