गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचीं माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 05:37 AM2017-09-13T05:37:11+5:302017-09-13T05:37:11+5:30

संपूर्ण राज्यामध्ये गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी आणणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. या संदर्भात आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

 After the Gudi Padva, the ban on plastic caribag, Environment Minister Ramdas Kadam | गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचीं माहिती

गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचीं माहिती

Next

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : संपूर्ण राज्यामध्ये गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी आणणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. या संदर्भात आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
प्लॅस्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पिशव्या बाजारात वापरता येतील, या बाबत अनेक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच महिला बचतगटांनाही अनुदान देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी त्यांना सबसिडी दिली जाईल. टप्प्याटप्याने राज्यातील महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांनाही प्लॅस्टिकवर बंदी घालण्याबाबत सांगण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांना नाविन्यपूर्ण योजनेसाठी दिलेल्या निधीतून काही निधी पर्यावरणपूरक गोष्टीसाठी खर्च करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले. आजच्या बैठकीला पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाचे सदस्य सचिव पी. एन. अनबलगन आदी उपस्थित होते.

मुंबईत अलिकडे झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक भागात प्रचंड पाणी साचले होते. जागोजागी फेकलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही, हे प्रमुख कारण समोर आले आहे.

Web Title:  After the Gudi Padva, the ban on plastic caribag, Environment Minister Ramdas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.