रस्ते घोटाळ्यात १८० अभियंत्यांवर कारवाई - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 02:15 AM2018-03-22T02:15:55+5:302018-03-22T02:15:55+5:30

मुंबई महापालिकेतील रस्ता दुरुस्ती घोटाळा प्रकरणी १८० अभियंत्यांवर विविध प्रकारची कारवाई करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

Action on 180 engineers in road scam - Devendra Fadnavis | रस्ते घोटाळ्यात १८० अभियंत्यांवर कारवाई - देवेंद्र फडणवीस

रस्ते घोटाळ्यात १८० अभियंत्यांवर कारवाई - देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई : मुंबई महापालिकेतील रस्ता दुरुस्ती घोटाळा प्रकरणी १८० अभियंत्यांवर विविध प्रकारची कारवाई करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, किरण पावसकर आदी सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न मांडला होता. यावर, रस्ते दुरुस्ती गैरव्यवहारातील चौकशीच्या पहिल्या टप्प्यात १०० अभियंत्यांवर दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली होती. त्यापैकी ९६ अभियंते दोषी आढळले. तर, दुसऱ्या टप्प्यात १६९पैकी १६७ अभियंते दोषी आढळले. दोन्ही चौकशींत ८४ अभियंते सामयिक असून त्यांना दोन्ही टप्प्यांतील चौकशीत जी शिक्षा जास्त असेल ती अंतिम करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
रस्ते दुरुस्तीप्रकरणी एकूण ६ अभियंत्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले असून, २३
जणांना पदावनत करण्यात
आले आहे. तर, १३ जणांची
पुढील तीन वर्षांसाठी, १७ जणांची दोन वर्षांसाठी, ६७ जणांची
एक वर्षासाठी वेतनवाढ रोखण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखी उत्तरात सांगितले.

तुकाराम मुंडेंना मुंबईत आणा
मुंबई महापालिकेत टक्केवारी खाण्याची परंपराच बनल्याने हे महानगर बकाल बनले आहे. तुकाराम मुंडेंसारख्या कडक शिस्तीच्या अधिकाºयाची नवी मुंबई, पुणे, नाशिक अशी बदली केली जाते. त्याऐवजी त्यांना मुंबई महापालिकेचे आयुक्त बनवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर यांनी केली.

Web Title: Action on 180 engineers in road scam - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.