सकाळी फेरफटका मारणे बेतले जीवावर: दिवा-वसई मार्गावर कोपर स्थानकात महिलेचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 07:42 PM2017-11-07T19:42:11+5:302017-11-07T19:45:35+5:30

दिवा-वसई मार्गावर कोपर स्थानकादरम्यान एका अज्ञात रेल्वेच्या धडकेने डोंबिवली पश्चिमेकडील टेल्कोसवाडी येथे राहणा-या विद्या पड्याळ(५५) या जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी घडली. त्या घटनेत विद्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना आधी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणि त्यानंतर एमआयडीसीच्या शिवम इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले.जखमी विद्या सोमवारपासूनच कोपर स्थानकाच्या परिसरात सकाळी मॉर्निंगवॉकला जात होत्या.

The accident happened at Kopar station on the Diva-Vasai route | सकाळी फेरफटका मारणे बेतले जीवावर: दिवा-वसई मार्गावर कोपर स्थानकात महिलेचा अपघात

कोपर स्थानक

Next
ठळक मुद्दे विद्या पड्याळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापतडोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद कोपर स्थानकात जाण्यासाठी पश्चिमेत पादचारी पूल असावा

डोंबिवली: दिवा-वसई मार्गावर कोपर स्थानकादरम्यान एका अज्ञात रेल्वेच्या धडकेने डोंबिवली पश्चिमेकडील टेल्कोसवाडी येथे राहणा-या विद्या पड्याळ(५५) या जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी घडली. त्या घटनेत विद्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना आधी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणि त्यानंतर एमआयडीसीच्या शिवम इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले.जखमी विद्या सोमवारपासूनच कोपर स्थानकाच्या परिसरात सकाळी मॉर्निंगवॉकला जात होत्या.

 दिवा-वसई मार्गावरील कोपर स्थानकात जाण्यासाठी रेल्वे ट्रॅकमधून जात असतांना हा अपघात घडल्याची माहिती स्थानिक नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी दिली. त्यांना तातडीने परिसरातील रहिवाश्यांनी लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. अद्ययावत उपचारासाठी त्यांना तातडीने शिवम रुग्णालयात हलवण्यात असून तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती राणे यांनी दिली. विद्या यांच्या कुटूंबियांना या अपघाताची माहिती असून डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद असल्याची माहिती पोलिस अधिकारी हरिदास डोळे यांनी दिली.
कोपर रोड परिसरातील बहुतांशी रेल्वे प्रवासी दिवा-वसई मार्गावरील कोपर स्थानकात जाण्यासाठी पश्चिमेकडील पादचारी पूल नसल्याने किडलँड शाळेजवळील शॉटकर्टचा वापर करतात. तेथून चढाव चढुन वर आल्यावर प्रवासी ट्रॅकमधून स्थानक गाठतात. त्या गोंधळात अनेकांचा अपघात झाला असून तेथे पादचारी पूल असावा अशी मागणी वर्षानूवर्षे प्रलंबित असल्याचे राणे म्हणाले.
==============

Web Title: The accident happened at Kopar station on the Diva-Vasai route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.