तलावांमध्ये ९० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 03:00 AM2018-08-17T03:00:38+5:302018-08-17T03:00:57+5:30

पावसाने दीर्घकाळापासून मुंबईत विश्रांती घेतली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये रिमझिम सुरू आहे. त्यामुळे सर्व तलावांमध्ये एकूण ९० टक्के जलसाठा जमा झाला आहे.

 About 90% of the storage in the Dam | तलावांमध्ये ९० टक्के जलसाठा

तलावांमध्ये ९० टक्के जलसाठा

Next

मुंबई  - पावसाने दीर्घकाळापासून मुंबईत विश्रांती घेतली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये रिमझिम सुरू आहे. त्यामुळे सर्व तलावांमध्ये एकूण ९० टक्के जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना या वर्षी पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही.
आतापर्यंत तुळशी, विहार, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा असे सर्व प्रमुख तलाव भरून वाहू लागले आहेत. भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांमध्येही पाण्याची चांगली स्थिती आहे. आजच्या घडीला तलावांमध्ये एकूण ९० टक्के जलसाठा जमा आहे. उर्वरित दहा टक्के जलसाठा येत्या महिन्याभरात जमा होणे अपेक्षित आहे.
मुंबईला दररोज ३,७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. वर्षभर हा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते. मात्र पावसाने बराच काळ विश्रांती घेतल्यामुळे सध्या १२ लाख ९९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे.

Web Title:  About 90% of the storage in the Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.