म्हाडाच्या लॉटरीसाठी सुमारे ६४ हजार अर्ज, आॅनलाइन नोंदणी संपली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 05:40 AM2018-08-18T05:40:11+5:302018-08-18T05:40:45+5:30

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी आॅनलाइन नोंदणीची मुदत संपली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६४ हजार ६१८ अर्ज दाखल झाल्याची माहिती म्हाडाने दिली.

About 64 thousand applications for MHADA online lottery | म्हाडाच्या लॉटरीसाठी सुमारे ६४ हजार अर्ज, आॅनलाइन नोंदणी संपली

म्हाडाच्या लॉटरीसाठी सुमारे ६४ हजार अर्ज, आॅनलाइन नोंदणी संपली

Next

मुंबई  - म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९ हजार १८ घरांच्या लॉटरीसाठी करण्यात येणारी आॅनलाइन नोंदणीची मुदत संपली आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६४ हजार ६१८ अर्ज दाखल झाल्याची माहिती म्हाडाने दिली. ६३ हजार ७७२ जणांनी घरासाठी नोंदणी केली आहे. कोकण मंडळाच्या या लॉटरीची सोडत २५ आॅगस्टला होईल.
म्हाडाने आॅनलाइन लॉटरीला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे ही लॉटरी आठवडाभर पुढे ढकलली होती. मात्र त्यानंतरही ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद कायम राहिला. त्यामुळे यापूर्वी लाखोंची होणारी नोंदणी यंदा केवळ हजारांवर येऊन थांबली आहे.
दरम्यान, ८ आॅगस्टपर्यंत अर्ज भरण्यासाठी दिलेली मुदत आता १८ आॅगस्टपर्यंत देण्यात आली आहे. म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यातील ही सर्वात मोेठी लॉटरी आहे. मात्र लॉटरी जाहीर झाल्यापासून लॉटरीमध्ये उच्च उत्पन्न गटाला दिलेल्या झुकत्या मापामुळे तसेच काही ठिकाणी घरांच्या किमती अवाजवी असल्याने या लॉटरीला अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला.
९ हजार १८ घरांसाठीची ही विक्रमी सोडत काढण्यात येणार
आहे. आता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात २५ आॅगस्टला सकाळी १० वाजता काढण्यात येईल.

Web Title: About 64 thousand applications for MHADA online lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.