१७.७३ लाख बँक खाती चौकशीच्या घेºयात - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:50 AM2017-11-09T03:50:54+5:302017-11-09T03:51:23+5:30

नोटाबंदीनंतर १७ लाख ७३ हजार अशी बँक खाती सापडली आहेत ज्यांच्यामध्ये भरलेले पैसे हे त्यांच्या मालकांच्या आयकराच्या माहितीशी विसंगत आहेत.

About 17.73 lakh bank accounts are investigated - Nitin Gadkari | १७.७३ लाख बँक खाती चौकशीच्या घेºयात - नितीन गडकरी

१७.७३ लाख बँक खाती चौकशीच्या घेºयात - नितीन गडकरी

googlenewsNext

मुंबई : नोटाबंदीनंतर १७ लाख ७३ हजार अशी बँक खाती सापडली आहेत ज्यांच्यामध्ये भरलेले पैसे हे त्यांच्या मालकांच्या आयकराच्या माहितीशी विसंगत आहेत. या खात्यांची चौकशी आयकर व इतर संबंधित खाती करीत आहेत, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.
नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. त्यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने उचललेल्या नोटबंदी व जीएसटीच्या पावलांमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे व काळ्या पैशाला चाप लागला आहे. ज्यांचे काळ्या पैशाचे व्यवहार होते ते लोक व त्यांना पाठिंबा देणारे राजकारणी यामुळे दु:खी झाले असले तरी हे निर्णय देशहिताचे असल्याने सर्वसामान्य लोक मात्र त्यावर खुष आहेत.
काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हजारो बनावट कंपन्या सापडल्या असून त्यांच्या बँक व्यवहारांचाही शोध लागला आहे. एका कंपनीची तब्बल २१३४ खाती आढळली. शंभरावर खाती असलेल्या अनेक कंपन्या असून काळा पैसा शोधण्यास मोठी मदत झाली आहे.

आयकर विभागाने केवळ कागदावर असलेल्या १ हजार १५० अशा कंपन्यांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे की ज्यांचा २२ हजारहून अधिक लाभार्र्थींनी १३ हजार ३०० कोटी रुपये इतका पैसा पांढरा करण्यासाठी उपयोग केला. नोटाबंदीमुळे ३.३० लाख कोटी रुपयांचे ११० कोटी डिजिटल व्यवहार झाले. क्रेडिट व डेबिट कार्डच्या माध्यमातून ३.३० लाख कोटींचे २४० कोटी व्यवहार झाले. प्रीपेड व्यवहारात दुपटीने वाढ झाली, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

Web Title: About 17.73 lakh bank accounts are investigated - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.