आरे कॉलनीतील आग जाणीवपूर्वक लावण्यात आली; अग्निमशन दलाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:37 AM2018-12-13T06:37:47+5:302018-12-13T06:54:16+5:30

गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील जंगलात लागलेली आग काही दिवसांपूर्वी विझली असली तरी आता ही आग कशामुळे लागली याच्या संशयाचा धूर मात्र आता पसरू लागला आहे.

Aare colony fire was sensitized; Report of the Agitation Team | आरे कॉलनीतील आग जाणीवपूर्वक लावण्यात आली; अग्निमशन दलाचा अहवाल

आरे कॉलनीतील आग जाणीवपूर्वक लावण्यात आली; अग्निमशन दलाचा अहवाल

Next

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील जंगलात लागलेली आग काही दिवसांपूर्वी विझली असली तरी आता ही आग कशामुळे लागली याच्या संशयाचा धूर मात्र आता पसरू लागला आहे. बुधवारी अग्निशामक दलाने जाहीर केलेल्या अहवालात आरे कॉलनीतील आग ही जाणीवपूर्वक लावण्यात आली होती असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणवादी संघटना, येथे राहणारे आसपासचे नागरिक यांनी यापूर्वी केलेल्या आरोपाला एक प्रकारे अग्निशामक दलाच्या या अहवालाने आग लावण्याच्या षड्यंत्रावर शिक्कामोर्तब झाले आहे.

अग्निशामक दलाच्या अहवालात आरेच्या जंगलातील आगीबाबत काही ठळक मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे आरेच्या जंगलात अनधिकृतरीत्या काही लोकांची ये-जा झाली असल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे, तसेच गैरपद्धतीने येथील प्रतिबंधित क्षेत्रात काही माणसांचा वावर झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहवालातील नोंदींनुसार, आग विझल्यानंतर केलेल्या तपासकामादरम्यान आग लागलेल्या ठिकाणी अर्धवट जळालेले टायर्स, बाटल्या, प्लॅस्टिक आढळून आले आहे. तसेच डोंगराला लागलेल्या मोठ्या आगीनंतरही तेथील काही भागावर आगीचा कोणताही परिणाम झालेला नव्हता, हे संशय निर्माण करणारे असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. आरेच्या आगीबाबत तपास करणाऱ्या पोलिसांना याबाबतीत अधिक तपासणी करण्यात यावी, असेही या अहवालात सुचविण्यात आले आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या या अहवालानंतर आरेतील आग लागली की लावली गेली? हा संशय आणखी गडद झाला आहे.

आरे भूखंडावर अनेकांची नजर
आरेच्या जंगलात लागलेल्या आगीचा अहवाल जाहीर झाल्याने अनेक गोष्टी प्रामुख्याने उघड झालेल्या आहेत. हा सगळा ‘नो डेव्हलपमेंट झोन’ (एन डी झेड) होता. हळूहळू तो आय. टी. पार्कसाठी खुला करण्यात आला. आता अजून जागा हवी म्हणून इथे जी झुडपे येतात त्यांना जाळून टाकण्याचा सपाटा लावला आहे. म्हणजे ती मोठी होणारच नाहीत आणि जागा विकासकांसाठी मोकळी करण्यात येईल.
दरवर्षी अशी आग लागते. फरक इतकाच की यंदा ती प्रमाणाबाहेर मोठी झाली आणि सगळ्यांचे तिच्याकडे लक्ष गेले़ या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे, असा आरोप पर्यावरणवाद्यांकडून याआधीच करण्यात आलाय. तर दुसरीकडे मेट्रो ३ च्या भव्य आरे कारशेडचं कामही याच भागात सुरू असल्याने ही आग लावली गेली असल्याचा आरोपही पर्यावरणवाद्यांनी आणि येथील नागरिकांनी केला होता. त्यामुळे या अहवालानंतर हे सर्व आरोपाने संशयाचा धूर हा अधिक गडद झाला आहे.

Web Title: Aare colony fire was sensitized; Report of the Agitation Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.