रेल्वे परिसरातून चार महिन्यांत ९९ मुलांची केली घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 02:28 AM2019-05-27T02:28:31+5:302019-05-27T02:28:35+5:30

गेल्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरात हरविलेल्या, पळून आलेल्या, रस्त्या चुकलेल्या ९९ मुलांची घरवापसी करण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले आहे.

99 children have been resettled in four months from the railway premises | रेल्वे परिसरातून चार महिन्यांत ९९ मुलांची केली घरवापसी

रेल्वे परिसरातून चार महिन्यांत ९९ मुलांची केली घरवापसी

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई विभागातून जानेवारी ते एप्रिल या गेल्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरात हरविलेल्या, पळून आलेल्या, रस्त्या चुकलेल्या ९९ मुलांची घरवापसी करण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले आहे. या ९९ मुलांमघ्ये ७४ मुले आणि २५ मुली यांचा आहे.
बाहेरील राज्यातील मुलांना मुंबईचे आकर्षण असल्याने अनेक मुले आपले घर सोडून रेल्वेने मुंबई गाठतात. जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये अशा प्रकारे पळून आलेल्या ६० मुले आणि ७ मुलींची घरवापसी केली आहे. या मुलांना रेल्वे परिसरातून ताब्यात घेत पुन्हा त्यांच्या राहत्या घरी सोडण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावर हरविलेल्या ८ मुलांची आणि ९ मुलींची सुटका करण्यात आली आहे.
अनोळखी शहरात हरविल्याने गोंधळलेल्या मुलांची समजूत काढून त्यांना घरी सोडण्यात येते. काही मुले पालकांच्या निष्काळजीपणामुळे लहान मुले हरवतात, तर काही वेळेला मुलांचे अपहरण केले जाते. अशा ५ मुलांना आणि ९ मुलींची मध्य रेल्वे रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने शोध घेऊन त्यांची घरवापसी केली आहे.
२०१८ मध्ये मुंबईच्या मायानगरीत हरविलेल्या ४७७ मुलांची घरवापसी करण्यात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला यश आले आहे. यामध्ये ३५४ मुले आणि १२३ मुलींची घरवापसी केली आहे. बाहेरील राज्यातून मुंबईत पळून येणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. अशा मुलांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सोपविण्यात येते, असे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: 99 children have been resettled in four months from the railway premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.