गोरेगावच्या छोटा काश्मीरमधून ७०० किलो कचरा गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 06:09 AM2019-04-22T06:09:36+5:302019-04-22T06:09:45+5:30

मुंबई : गोरेगाव येथील छोटा काश्मीर या ठिकाणी वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. हे लक्षात ...

700 kg of garbage collection in Goregaon small Kashmir | गोरेगावच्या छोटा काश्मीरमधून ७०० किलो कचरा गोळा

गोरेगावच्या छोटा काश्मीरमधून ७०० किलो कचरा गोळा

googlenewsNext

मुंबई : गोरेगाव येथील छोटा काश्मीर या ठिकाणी वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. हे लक्षात घेता येथे स्वच्छता मोहीम हाती घेण्यता आली आहे. स्वच्छता मोहिमच्या पहिल्या आठवड्यात येथून ६०० किलो कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता मोहिमेदरम्यान २०० मद्याच्या बाटल्या, ४०० हून अधिक पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि १०० हून जास्त वेफर्सचे पॅकेट जमा करण्यात आले. रविवारीसुद्धा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून या वेळी ३०० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, ५० किलो वेफर्स पॅकेट आणि प्लॅस्टिक कचरा तसेच ५० हून अधिक मद्याच्या बाटल्या जमा करण्यात आल्या. अशा प्रकारे आतापर्यंत ७०० किलो कचरा गोळा करण्यात आला आहे.

आरे कॉलनीमधील छोटा काश्मीर येथे गेल्या काही आठवड्यांपासून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून छोटा काश्मीरमध्ये अस्वच्छता पसरली होती. त्यामुळे पर्यटकांची संख्या कमी होत गेली. परंतु महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरणवादी, पर्यावरण संबंधित संस्था यांनी पुढाकार घेऊन छोटा काश्मीर स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे. याची दखल जम्मू-काश्मीरमधील ‘वाइल्ड कन्झर्वेशन फंड’ या संस्थेने घेतली असून यासाठी लागणारी मदत करण्याचे लेखी आश्वासन ‘मिशन ग्रीन मुंबई’ या संस्थेला दिले.
मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभजीत मुखर्जी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या ‘वाइल्ड कन्झर्वेशन फंड’ या संस्थेला छोटा काश्मीरमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचे काम आवडले असून त्यांनी मदतीचा हात दिला आहे. संस्थेतर्फे छोटा काश्मीरच्या तलावात विहार करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध ‘शिकारा’ भेट स्वरूपात दिली जाणार आहे. तसेच आर्थिक मदत आणि इतर गोष्टींसाठी लागणारी सामग्री संस्था पुरविणार आहे. छोटा काश्मीर परिसरात कचºयाचा एकच डबा ठेवण्यात आला आहे. तेथे ३० डब्यांची आवश्यकता असून ही स्वच्छता मोहीम वर्षभर राबविली जाणार आहे.

Web Title: 700 kg of garbage collection in Goregaon small Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.