5700 कोटींचा ऐवज जप्त; दोन बँक अधिका-यांना अटक, 6 अधिकारी चौकशीच्या फे-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 06:04 AM2018-02-18T06:04:36+5:302018-02-19T19:34:01+5:30

नीरव मोदी याने घडविलेल्या ११,४00 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) दोन वरिष्ठ अधिका-यांसह तिघांना सीबीआयने शनिवारी अटक केली. न्यायालयाने तिघांना १४ दिवसांची सीबाआय कोठडी सुनावली आहे. कंपनीचे स्वाक्षरी हक्क असलेल्या एका अधिका-यासही अटक केली आली आहे.

5,700 crores of money seized; Two bank officials arrested, 6 officials in-charge of inquiry | 5700 कोटींचा ऐवज जप्त; दोन बँक अधिका-यांना अटक, 6 अधिकारी चौकशीच्या फे-यात

5700 कोटींचा ऐवज जप्त; दोन बँक अधिका-यांना अटक, 6 अधिकारी चौकशीच्या फे-यात

Next

नवी दिल्ली/मुंबई/न्यूयॉर्क : नीरव मोदी याने घडविलेल्या ११,४00 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) दोन वरिष्ठ अधिका-यांसह तिघांना सीबीआयने शनिवारी अटक केली. न्यायालयाने तिघांना १४ दिवसांची सीबाआय कोठडी सुनावली आहे. कंपनीचे स्वाक्षरी हक्क असलेल्या एका अधिका-यासही अटक केली आली आहे.
ईडीने आजही नीरव मोदीच्या २१ ठिकाणांवर छापे मारले आणि हिरे, सोने, मौल्यवान रत्न, दागिने अशी २५ कोटी रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. आतापर्यंत मोदी व चोकसी यांच्यावर घालण्यात आलेल्या धाडींतून सुमारे ५,७00 कोटी रुपये किमतीचा ऐवज हाती लागला आहे.
पीएनबीचा उपव्यवस्थापक (निवृत्त) गोकुळनाथ शेट्टी व मनोज खरात यांच्यासह हेमंत भट याला सीबीआयने अटक केली. हेमंत भट हा नीरव मोदीच्या कंपनीचा कर्मचारी होता. या प्रकरणात २८0 कोटींची फसवणूक झाल्याचे बँकेने तक्रारीत नमूद केले होते. तथापि, सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत १५0 लेटर्स आॅफ अंडरटेकिंग (एलओयू) समोर फसवणुकीचा आकडा ६,४९८ कोटींवर गेला आहे. काल आणखी ४,८८६ कोटींच्या १५0 एलओयू प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. दुसरी तक्रार मेहुल चोकसी याच्या गीतांजली जेम्स, नक्षत्र ब्रँडस् आणि गिली कंपन्यांविरुद्ध आहे. हे सर्व एलओयू २0१७-१८ या वर्षातील आहेत वा नूतनीकृत झालेले आहेत. बँकेचे आणखी ६े अधिकारीही चौकशीच्या फेºयात सापडले आहेत.
पीएनबीने आणखी ८ अधिकाºयांना निलंबित केले असून, निलंबित अधिकाºयांची संख्या आता १८ झाली आहे. बँकेने १0 अधिकाºयांना गेल्या महिन्यात निलंबित केले होते. निलंबितांमध्ये मुंबईतील २ सरव्यवस्थापकांचा समावेश आहे. गोकुळनाथ शेट्टी याची अनेक वर्षे ब्रॅडी हाउस शाखेतून बदली न केल्याबद्दल मनुष्यबळ विभागाच्या सरव्यवस्थापकाची आता बदली करण्यात आली आहे.

पीएनबीला होता दक्षता आयोगाचा पुरस्कार
पीएनबीला २0१६-१७ सालचा केंद्रीय दक्षता आयोगाचा सर्वोत्तम ‘दक्षता’ पुरस्कार मिळाला होता. ज्या बँकेत इतका मोठा घोटाळा झाला, तेथील दक्षता यंत्रणा त्या वेळी काय करीत होती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दक्षता आयोगाने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता, तसेच अर्थमंत्रालयाच्या वित्तसेवा विभागाचे सचिव यांना सोमवारी केंद्रीय दक्षता आयुक्तांनी या प्रकरणाच्या झाडाझडतीसाठी बोलावले आहे.

मोदीच्या घरांत
नीरव शांतता
मुंबईतील पेडर रोडवरील ग्रॉसव्हेनर हाउस इमारतीच्या दुसºया मजल्यावर नीरव मोदीच्या कुटुंबीयांच्या नावे घरे आहेत. नीरवचे वडील दीपक मोदी आणि भाऊ नीशाल डी मोदी अशा दोन पाट्या घरांवर दिसतात, पण या घरांत आता नीरव शांतता आहे. तेथे नुसतेच नोकर राहतात. तसेही मोदी या घरांत अनेक वर्षांत जेमतेम ३-४ वेळाच आल्याचे शेजारी सांगतात. मुंबईचे माजी शेरीफ किरण शांताराम हे त्यांचे शेजारी आहेत. शांताराम यांच्या पत्नी ज्योती यांनी सांगितले की, ‘हे लोक मैत्रीपूर्ण नव्हते.’ येथून काही मैलावर गोकुळ अपार्टमेंटमध्ये मेहुल चोकसीचे पेंटहाउस आहे. वरळीला समुद्र महलमध्ये त्याचे निवासस्थान आहे.

१७,५०० कोटींची इतर बँकांना झळ
पीएनबी घोटाळ््यामुळे इतर किमान ५ बँकांना १७,५०० कोटी रुपयांचा फटका बसू शकेल, असा प्राप्तिकर विभागाचा अंदाज आहे. पीएनबीवर विसंबून या इतर बँकांनीही नीरव मोदी व मेहुल चौकसी यांच्या कंपन्यांना कर्जे व बँक गॅरेन्टी दिल्या आहेत. प्राप्तिकर विभागानुसार हा प्राथमिक अंदाज असून, अन्य बँकांना प्रत्यक्ष लागणारी झळ याहूनही कदाचित जास्त असू शकेल. मोदी व त्याच्या समूहाच्या २९ मालमत्तांवर जप्ती आणण्यात आली आहे, तर त्यांची १०५ बँक खाती गोठविण्यात आली आहेत.

नीरव मोदी
न्यूयॉर्कच्या हॉटेलात?
परराष्टÑ मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, नीरव मोदी न्यूयॉर्क येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या ३६व्या मजल्यावरील एका आलिशान सूटमध्ये आहे. त्याच्याकडे बेल्जियमचा पासपोर्ट असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

आॅडिटमध्ये काहीच
कसे नाही?
पीएनबीचे अनेक माजी अधिकारीही आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. ज्यांनी नियम मोडले, तसेच पर्यवेक्षीय जबाबदाºया नीट पार पाडल्या नाहीत, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. यातील अनेक अधिकारी आता दुसºया बँकांत आहेत. एक उपव्यवस्थापक व २ कर्मचारी अशा तिघांनी २00 पेक्षा जास्त एलओयू जारी केले, तरी ते आॅडिटमध्ये कसे काय सापडले नाही, याचाही तपास होणार आहे.

सगळ्या मोदींनी देशाला छळले : पवार
गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी हा पंतप्रधान मोदी यांच्या काळात ११ हजार कोटी रुपये घेऊन पळून गेला. देशाला फसवून जे पळून गेले, ते सारेच भाजपासमर्थक होते. या सर्व मोदींनी देशाला छळले आहे, अशी टीका राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

Web Title: 5,700 crores of money seized; Two bank officials arrested, 6 officials in-charge of inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.