फ्लिपकार्टवरुन मागविला 55 हजारांचा 'आयफोन', मिळाला 'साबण' !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 07:58 PM2018-02-02T19:58:46+5:302018-02-02T20:01:45+5:30

फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साइटवरुन मुंबईतील एका व्यक्तीने 55 हजारांचा आयफोन -8 ऑनलाईन ऑर्डर केला. मात्र, या ऑर्डरची डिलिव्हरी आल्यानंतर त्यामध्ये कपडे धुण्याचा साबण मिळाला आहे.

55 thousands of 'iPhone' received from Flipkart, got 'Soap'! | फ्लिपकार्टवरुन मागविला 55 हजारांचा 'आयफोन', मिळाला 'साबण' !

फ्लिपकार्टवरुन मागविला 55 हजारांचा 'आयफोन', मिळाला 'साबण' !

Next

मुंबई : ई-कॉमर्स वेबसाइट्सवरुन काही वस्तू खरेदी करणे अनेकदा त्रासदायक ठरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साइटवरुन मुंबईतील एका व्यक्तीने 55 हजारांचा आयफोन -8 ऑनलाईन ऑर्डर केला. मात्र, या ऑर्डरची डिलिव्हरी आल्यानंतर त्यामध्ये कपडे धुण्याचा साबण मिळाला आहे. याप्रकरणी या व्यक्तीने फ्लिपकार्ट कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, फ्लिपकार्ट कंपनीने सुद्धा या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
तरबेज मेहबूब नागराळी असे या व्यक्तीचे नाव असून त्याने फ्लिपकार्टवरुन आयफोन -8 ची ऑर्डर केली होती. त्याचबरोबर त्याने ऑनलाइन पेमेंट देखील केले होते. मात्र त्याला डिलिव्हरी दरम्यान आयफोन -8  न मिळता साबण मिळाला. दरम्यान, याप्रकरणी तरबेजने येथील भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तरबेजच्या पनवेलच्या घरी  22 जानेवाला डिलिव्हरी आली होती. यावेळी पॅकिंग बॉक्समध्ये आयफोन मोबाईलऐवजी साबण निघाला. याप्रकरणी तरबेजने काल (दि.1) फ्लिपकार्ट कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून याचा तपास सुरु आहे, अशी माहिती भायखळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिंगटे यांनी दिली आहे. 

Web Title: 55 thousands of 'iPhone' received from Flipkart, got 'Soap'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.