म्हाडा संक्रमण शिबिरांचे ४३ विकासकांनी थकवले १३५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:49 AM2019-06-17T03:49:12+5:302019-06-17T03:49:23+5:30

संपत्ती जप्त करून म्हाडा वसुल करणार भाडे

43 developers of MHADA transit camps exhausted 135 crores | म्हाडा संक्रमण शिबिरांचे ४३ विकासकांनी थकवले १३५ कोटी

म्हाडा संक्रमण शिबिरांचे ४३ विकासकांनी थकवले १३५ कोटी

Next

मुंबई : मुंबईमध्ये काही इमारतींचा पुनर्विकास करताना खाजगी विकासकांमार्फत म्हाडाच्या संक्रमण शिबिरांतील गाळे भाडेतत्वावर घेण्यात आले आहेत. यातील ४३ विकासकांनी म्हाडाच्या या गाळांचे भाडे थकवले आहे़ या थकीत भाड्याची रक्कत १३५ कोटी ५२ लाख रूपयांवर गेली आहे. त्यामुळे भाडे भरावे म्हणून म्हाडाने या विकासकांंना अनेकवेळा नोटीसाही पाठवल्या आहेत़ तरीही भाडे न भरल्याने म्हाडा आयकर विभागाच्या मदतीने या विकासकांची संपत्ती जप्त करून भाडे वसुल करणार आहे.

मुंबईतील धोकादायक, दुर्घटनाग्रस्त किंवा कोसळलेल्या उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांचे म्हाडाच्या संक्रमण शिबिरांमध्ये पुनर्वसन करण्यात येते. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे संक्रमण शिबिरांमध्ये सन १९९७ पासून ते सन २०१७ पर्यंत विकासकांनी भाडेतत्त्वावर घरे घेतली आहेत. योजना पूर्ण होईपर्यंत विकासकांनी त्या घरांचे भाडे वेळेत भरणे अपेक्षित आहे. अनेक विकासकांनी भाडे न भरता ही रक्कम थकीत ठेवली आहे. त्यामुळे या थकीत रक्कमेचा आकडा १३५ कोटी ५२ लाख इतका झाला आहे.
थकीत रक्कम वसूल करण्यास म्हाडाने थकबाकीदार विकासक आणि त्यांच्या थकवलेल्या भाड्याची यादी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून तयार करण्यात आली आहे. यापूवीर्ही म्हाडाकडून थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न झाला. तो यशस्वी झाला नाही. अशा विकासकांकडून भाडे वसुलीसाठी नोटीसा पाठवण्यात येत आहेत. लवकरच पुढील कारवाईही म्हाडाकडून करण्यात येणार आहे.
 

Web Title: 43 developers of MHADA transit camps exhausted 135 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा