राज्यात ४ लाख ८८ हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:01 AM2019-05-26T06:01:22+5:302019-05-26T06:01:43+5:30

लोकसभा निवडणुकीत राज्यात ४ लाख ८८ हजार ७६६ मतदारांनी ‘नोटा’ (नन ऑफ द अबोव्ह) हा पर्याय निवडल्याचे समोर आले आहे.

4 lakh 88 thousand voters prefer 'note' to the state | राज्यात ४ लाख ८८ हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

राज्यात ४ लाख ८८ हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

Next

- खलील गिरकर 
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात ४ लाख ८८ हजार ७६६ मतदारांनी ‘नोटा’ (नन ऑफ द अबोव्ह) हा पर्याय निवडल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण मतदानाच्या तुलनेत ही आकडेवारी ०.९ टक्के इतकी आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २९ हजार ४७९ मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये नोटाला झालेले मतदान आणि येथील विजयी उमेदवार इम्तियाज जलील (एमआयएम) यांचे मताधिक्य (४,४९२ मते) सारखेच आहे.
याखालोखाल नोटाचा वापर नंदूरबार २१ हजार ९२५, ठाणे २० हजार ४२६, भिवंडी १६ हजार ३९७, मावळ १५ हजार ७७९, जालना १५ हजार ६३७, रत्नागिरी-सिंधुदूर्ग १३ हजार ७७७, कल्याण १३ हजार १२, रामटेक ११ हजार ९२०, रायगड ११ हजार ४९०, चंद्रपूर ११ हजार ३७७, पुणे ११ हजार १, भंडारा गोंदिया १० हजार ५२४, जळगाव १० हजार ३३२, उस्मानाबाद १० हजार २४ याप्रकारे करण्यात आला आहे. राज्यातील २५ मतदारसंघात १० हजारांपेक्षा कमी मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. त्यात अहमदनगर ४०७२ , अकोला ८८६६, अमरावती ५३२२, बारामती ७८६८, बीड २५००, धुळे २४७५, दिंडोरी ९४४६, हातकणंगले ७१०८, हिंगोली ४२४२, कोल्हापूर ८६९१, लातूर ६५६४, माढा ३६६६, नागपूर ४५७८, नांदेड ६११४, नाशिक ६९८०, परभणी ४५५०, रावेर ९२१६, सांगली ६५८५, सातारा ९२२७, शिर्डी ५३९४, शिरूर ६०५१, सोलापूर ६१९१, वर्धा ६५१०, यवतमाळ-वाशीम ३९६६, बुलढाणा ७६८१ या मतदारांचा समावेश आहे.
काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा जास्त मते
राज्यात भाजपला १ कोटी ४९ लाख १२ हजार १३९ म्हणजेच २७.५९ टक्के मतदान झाले. शिवसेनेला १ कोटी २५ लाख ८९ हजार ६४ (२३.३ टक्के) मते मिळाली.
अवघी एक जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला १६.३ टक्के मतदान होऊन ८७ लाख ९२ हजार २३७ मते मिळाली, तर ४ जागांवर विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला १५.५२ टक्के मतदान होऊन ८३ लाख ८७ हजार ३६३ मते मिळाली आहेत.
>मुंबईतील चित्र
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ८२ हजार २७५ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांमध्ये १० हजार पेक्षा जास्त मतदारांनी नोटाचा पर्याय वापरला आहे. उत्तर मध्य मुंबईत १० हजार ६४७ , उत्तर मुंबईत ११ हजार ९६६, दक्षिण मुंबईत १५ हजार ११५, उत्तर पूर्व मुंबईमध्ये १२ हजार ४६६, उत्तर पश्चिम मुंबई मध्ये १८ हजार २२५ व दक्षिण मध्य मुंबईमध्ये १३ हजार ८३४ जणांनी नोटा पर्याय निवडला.

Web Title: 4 lakh 88 thousand voters prefer 'note' to the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.